esakal | बापाच्या डोळ्यासमोरच चिमुकली खेळत होती, पण भरधाव वाहन आलं अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं
sakal

बोलून बातमी शोधा

girl died in road accident at amravati

छत्रीतलाव ते महादेवखोरी मार्गावरील बेड्यावर जितेंद्र साकचंद भोसले हे पाल टाकून वास्तव्यास आहेत. त्यांची लहान मुलगी घरासमोर रस्त्यावर खेळत असताना भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाची तिला जोरदार धडक बसली. यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.

बापाच्या डोळ्यासमोरच चिमुकली खेळत होती, पण भरधाव वाहन आलं अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती : चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. छत्री तलाव ते महादेवखोरी मार्गावर सोमवारी (ता. २) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

छत्रीतलाव ते महादेवखोरी मार्गावरील बेड्यावर जितेंद्र साकचंद भोसले हे पाल टाकून वास्तव्यास आहेत. त्यांची लहान मुलगी घरासमोर रस्त्यावर खेळत असताना भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाची तिला जोरदार धडक बसली. यामध्ये तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. फ्रेजरपुरा पोलिसांनी जितेंद्र भोसले यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या वाहनचालकाचा शोध सुरुवात केली आहे.

अत्याचार करणाऱ्याला आजन्म कारावास, चिमुकलीचे केले होते अपहरण

एका पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला अमरावती जिल्हा व सत्र  न्यायालयाने आज आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. 

वरुड तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या व मूळचा नागपूरच्या कळमेश्‍वर येथील रहिवासी रेवनाथ ऊर्फ सूर्यभान रामप्रसाद धुर्वे याने 27 एप्रिल 2018 ला दुपारी १ वाजता एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला वर्धा नदीच्या पात्राजवळ नेले व तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर रात्री त्या मुलीला त्रास होत होता. त्यामुळे आईने विचारपूस केल्यावर तिला घडलेला प्रकार लक्षात आला. वरुड पोलिस ठाण्यात दुसऱ्या दिवशी या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर 30 एप्रिल रोजी रेवनाथ याला अटक करण्यात आली. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर तिच्या शरीरावर 11 जखमा आढळून आल्या. त्यामुळे वरुड येथील ग्रामीण रुग्णालयातून तिला अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

हेही वाचा -  विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदार

वरुडच्या पोलिस उपनिरीक्षक प्रिया उमाळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात सहाय्यक सरकारी वकील ऍड. दिलीप तिवारी यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले, त्यामध्ये चार वैद्यकीय अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश होता. सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश  निखिल मेहता यांनी रवनाथ धुर्वे याला दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीला पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून एएसआय अशोक पवार यांनी काम पाहिले, असे ऍड. दिलीप तिवारी यांनी सांगितले.
 

loading image