esakal | अखेर मिळाला न्याय, जादूटोण्यावरून ठार मारणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

court gives life imprisonment to two people in gadchiroli

तक्रारदार वारली दोबा गाडवे व तिचा पती दोबा गाडवे हे आपल्या शेतातील झोपडीत झोपले होते. रात्रीचे 2 ते 3 वाजताच्या सुमारास आरोपी झोपडीत आले. त्यांनी दोबा गाडवे याला उठवून तू जादूटोणा करतोस म्हणून मारहाण केली. चेहऱ्यावर व डोक्‍यावर कुऱ्हाडीने मारहाण केली.

अखेर मिळाला न्याय, जादूटोण्यावरून ठार मारणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : जादूटोण्याच्या संशयावरून डोक्‍यावर कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार करणाऱ्या दोन आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ४० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ही सुनावणी घेतली असून रुपू डुकरू पुंगाटी (वय ४१)आणि महारू दसरू गाडवे (वय ३३), असे आरोपींची नावे आहेत. दोघेही भामरागडमधील कोठी येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा -  ‘आमचे राज्य- विदर्भ राज्य’च्या घोषणांनी दणाणला...

तक्रारदार वारली दोबा गाडवे व तिचा पती दोबा गाडवे हे आपल्या शेतातील झोपडीत झोपले होते. रात्रीचे 2 ते 3 वाजताच्या सुमारास आरोपी झोपडीत आले. त्यांनी दोबा गाडवे याला उठवून तू जादूटोणा करतोस म्हणून मारहाण केली. चेहऱ्यावर व डोक्‍यावर कुऱ्हाडीने मारहाण केली. दोबा गाडवे यांची पत्नी वारली हिने आरोपी रूपू याच्या हातातील कुऱ्हाड हिसकाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, रूपूने वारली हिच्या हातावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर रूपूने सोबत आणलेल्या घणाने दोघांच्याही डोक्‍यावर व उजव्या हातावर वार करून दोबा गाडवे याला जिवानिशी ठार केले. याबाबत कोठी पोलिस मदत केंद्रात 5 एप्रिल 2018 ला तक्रार दाखल करण्यात आली.

हेही वाचा - व्यवसायातील भागीदारांनीच केली दीड कोटींची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

भामरागड पोलिस ठाण्यात कलम 302, 307, 120 ब, 34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिथून सावंत यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने तक्रारदार व साक्षीदारांचे बयाण नोंदवून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आढळून आल्याने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी दोन्ही आरोपीस जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रूपयांचा दंड तसेच तक्रारदारास 20 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सोमवारी (ता.28)दिले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एन.एम. भांडेकर यांनी बाजू मांडली, कोर्ट पैरवी म्हणून प्रकाश तुनकलवार यांनी काम पाहिले.