खड्डे केव्हा बुजवणार ते सांगा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नागपूर : रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती उद्याच मंगळवारी (ता. 15) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदार आणि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती मागील सुनावणीत पोलिस प्रशासनाने दिली होती. 

शहरातील खड्ड्यांच्या समस्येबाबत उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. एप्रिल 2019 पासून शहरातील खड्ड्यांमुळे 22 अपघात झालेत. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, 28 जण जखमी झाले आहेत. न्यायालयाने पोलिस प्रशासन आणि महापालिकेला मागील सुनावणीत कठोर शब्दांमध्ये खडावले होते. सोमवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पालिकेला रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत कुठले पाऊल उचलण्यात आले आणि कुठल्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला जातो आहे, याबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले. महापालिकेला उद्या (मंगळवारी) ही माहिती सादर करायची आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: court, pits