esakal | या शहराच्या सीमा पुन्हा सिल, जाणून घ्या कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

corona test positive

कोरोना विषाणू कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याने अकोला शहराच्या सीमा सिल करण्यात आल्या होत्या. ही मुदत पुढील आदेशापर्यंत वाढविण्याचे निर्देश बुधवारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिलेत.

या शहराच्या सीमा पुन्हा सिल, जाणून घ्या कारण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 चा संसर्ग वाढत असल्याने अकोला शहराच्या सीमा सिल करण्यात आल्या होत्या. ही मुदत पुढील आदेशापर्यंत वाढविण्याचे निर्देश बुधवारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी दिलेत.


अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या बैदपुरा येथे 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याला 50 दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला. त्यानंतरही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी तर एकाच दिवसात 72 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना कठोर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी अकोला शहराच्या सीमा सिल करण्याचा आदेश बुधवारी नव्याने काढण्यात आला. त्यानुसार पुढील आदेशापर्यंत संपूर्ण शहराच्या सीमा अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.


या सीमा राहतील सिल
डाबकी रोड रेल्वे गेट, बाळापूर नाका, शिवर बायपास, वाशीम बायपास, पाचमोरी अकोट फैल अकोट रोड, दमाणी हॉस्पिटल आपातापा रोड, गुडधी रेल्वे गेट, खरप रेल्वे गेट, खडकी बायपास, मलकापूर एमआयडीसी रेल्वे गेट, महाबीज पक्रियाकेंद्र शिवणी चौक, पोलिस प्रशिक्षण केंद्र आरपीटीएस रोड, नायगाव रोड.

प्रतिबंधित क्षेत्रात वाहनांवर बंदी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वाहन वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. येथे अत्यावश्‍यक सेवा पुरवण्यासाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र त्या घरपोच देण्याची व्यवस्था प्रशासनाला करावी लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या नागरिकांना या क्षेत्रात जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळी, सायंकाळी पिरणे बंद
अकोला शहरातील संसर्गीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांना सकाळी व सायंकाळी फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर फौजदारी करावाई करण्याचा आदेशही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. 

loading image