COVID2019 : जनता कर्फ्यूदरम्यान हे डॉक्टर देताय घरपोच वैद्यकीय सेवा

पंजाबराव ठाकरे
रविवार, 22 मार्च 2020

आरोग्यविषयक अत्यावश्‍यक सेवा हवी असेल तर बाहेर निघण्याची गरज नाही. उलट एका कॉलवर डॉक्टर रुग्णापर्यंत पोहोचतील, असे आवाहन डॉक्टरांनी केले असून आपले मोबाईल क्रमांकही नागरिकांसाठी जाहीर केले आहेत.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या दहशतीमुळे संपूर्ण जग हादरले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी रविवारी (ता.22) जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या काळात नागरिकांना कुठलीही आरोग्यविषयक अत्यावश्‍यक सेवा हवी असेल तर बाहेर निघण्याची गरज नाही. उलट एका कॉलवर डॉक्टर रुग्णापर्यंत पोहोचतील, असे आवाहन डॉक्टरांनी केले असून आपले मोबाईल क्रमांकही नागरिकांसाठी जाहीर केले आहेत.

संग्रामपूर जनरल प्रॅक्टिश्‍नर संघटनेच्यावतीने जाहीर आवाहनात म्हटले की, संग्रामपूर तालुक्यातील कुणालाही वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास किंवा अतितातडीची सेवा आवश्यक असल्यास आपण फक्त मोबाईल क्रमांकावर कॉल करावा. यासाठी रुग्णाला दवाखान्यात यायची आवश्यकता नाही. सेवा ही धर्म मानत संग्रामपूर डॉक्टर संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - अकोलेकर खरोखरच सातच्या आत घरात

रविवार (ता.22) हा दिवस जनता कर्फ्यू म्हणून पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. दिवसभर प्रत्येकाने घराबाहेर निघू नये व गर्दी करू नये हा उद्देश ठेऊन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्नही यातून होत आहे. म्हणून ज्यांना कुणाला वैद्यकीय अडचण असल्यास त्यांनी दवाखान्यात येण्याचे टाळून मोबाईल नंबरवर कॉल करावा, असे म्हटले आहे.

असे आहेत डॉक्टरांचे क्रमांक
डॉ. संजय महाजन (मो. 9922048085 / 9422184846), डॉ. मनोज तायडे (मो. 9158946410), डॉ. योगेश घाटे (मो. 8446781054), डॉ. योगेश सपकाळ (मो. 9975740200), डॉ. हरिभाऊ अंभोरे (मो. 9922668283), डॉ. जुबेर (मो. 9422336610), डॉ. अनिल मंडोरा (मो. 9420564769), डॉ. सुरतकर (मो. 9423445247)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID2019 : During the public curfew, the doctor provides home medical services