पोलिसांनो, तैनातीबाबत होणार 'क्रॉसचेकींग'; उपस्थित नसल्यास होणार कारवाई

cp order to cross check fix point about police availability in amravati
cp order to cross check fix point about police availability in amravati

अमरावती : शहरात वाढत्या चोऱ्या, घरफोडी, चेनसॅन्चिंगच्या घटनांनी पोलिसांना हैराण करून सोडले. ते गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. त्यामुळे येत्या काळात फिक्‍स पॉइंट वाढविल्या जातील. पोलिसांच्या तैनातीबाबत अचानक क्रॉसचेकिंग करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.

मासिक गुन्हेविषयक आढावा बैठकीत शुक्रवारी (ता. 11) बराच खल झाला. सकारात्मक पोलिसिंगवर भर देण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी वेगात वाहन चालविणाऱ्यांकडून अपघात होत आहे, त्याला आळा घालण्यासाठी ड्रिंक ऍण्ड ड्राइव्ह अंतर्गत कारवाईचे आदेश शहर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरात पायी व दुचाकीने पेट्रोलिंग करण्यात येते. बऱ्याच ठिकाणी, मुख्य चौकात पोलिसांची पॉइंट ड्यूटी असते. परंतु, नेमलेल्या पॉइंटवर कर्मचारी तैनात नसल्याची बाब या बैठकीत चर्चिल्या गेली. त्यामुळे पॉइंटवर तैनात पोलिसांनी कायम तैनाती बंधनकारक करण्यात आली. असे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी तंबी दिली. येत्या काळात तपासणीत असे काही गैरकाम आढळल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला. दाखल होणारे गुन्हे उघडकीस आणण्यासोबत ठाण्यात व आयुक्तालयाच्या स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढून दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घेण्यास सांगितले. 

दहाही ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांच्या रेकॉर्डवर सराईत गुन्हेगार म्हणून अनेकांची नोंद आहे. बऱ्याच गुन्ह्यात जुनेच व्यक्ती सापडतात. अशा गुन्हेगारांचे रेकॉर्ड अपडेट ठेवण्यास अधिकाऱ्यांना सांगितले.
-डॉ. आरती सिंग, पोलिस आयुक्त, अमरावती.

फॅन्सी नंबरप्लेटची वाहने रडारवर - 
बिना नंबरप्लेट व फॅन्सी नंबरप्लेटची वाहने वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. अनेकांनी मुदतीच्या आत दुचाकीवर नंबरच टाकले नाही. त्यामुळे त्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. शुक्रवारी (ता.11) अशा 22 वाहनांवर कारवाई करण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com