
मोताळा : अवैध सावकारीच्या तक्रारीवरून सहकार विभागाच्या पथकाने मोताळा तालुक्यातील जयपूर येथील संदीप विनायकराव देशमुख यांच्या राहत्या घरी गुरुवारी (ता. १७) धाड टाकून झाडाझडती घेतली. यावेळी कोरे बॉण्ड, विविध व्यक्तींचे ६१ कोरे चेक, सावकारीच्या नोंदी असलेली वही आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे.