esakal | वीरपुत्राला देणार अखेरचा निरोप; गावावर शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

creamation on heroic son in buldana.jpg

चंद्रकांत भाकरे कोरोना येण्याअगोदर पुण्यात ड्युटीवर होते. त्यांचे कॉन्स्टेबल पदावरून हेड कॉन्स्टेबल पदासाठी लवकरच प्रमोशन होणार होते.

वीरपुत्राला देणार अखेरचा निरोप; गावावर शोककळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : जम्मू काश्मीरमध्ये काल झालेल्या हल्ल्यात पातुर्डा येथील जवान शहीद झाला. त्यांची पत्नी, मुले, आई हे पुण्यात होते. त्यांना तातडीने विशेष बसची व्यवस्था करून 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान पातुर्डा येथे आणण्यात आले.

पातुर्डा येथून शहीद होणारे चंद्रकांत भाकरे दुसरे जवान ठरले आहेत. या अगोदर 1987 साली बाबुराव वानखडे हे जवान आर्मी मध्ये शहीद झाल्याची माहिती आहे. चंद्रकांत भाकरे कोरोना येण्याअगोदर पुण्यात ड्युटीवर होते. त्यांचे कॉन्स्टेबल पदावरून हेड कॉन्स्टेबल पदासाठी लवकरच प्रमोशन होणार होते. या प्रमोशनमधील एक बॅच पुढे गेली. दुसरी यांची बॅच जाणार होती. परंतु कोरोनामुळे यांना थांबविण्यात आले होते. कोरोनाचे संकट येताच त्यांना पुण्याच्या सेंटर वरून श्रीनगरला पाठविण्यात आले होते.

आवश्यक वाचा - अकोला पोलिसांनी गुंडासाठी राबविला 'मुळशी पॅटर्न'

18 एप्रिल रोजी झालेल्या आंतकी हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याची बातमी प्रसारित होत असताना त्यात बुलडाणा जिल्ह्यातून चंद्रकांत भाकरे यांचेही नाव आले. आर्थिक, शैक्षणिक आणि विकासाचे बाबतीत मागास असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा सारख्या गावात ही माहिती येताच सर्वांची मने सुन्न झाली. शहीद चंद्रकांत यांनी गावातच 12 वी पर्यत शिक्षण पूर्ण केले. मनाने संयमी, मनमिळाऊ असलेले चंद्रकांत निघून गेल्याचे दुःख ही त्यांच्या कुटुंबासह मित्र परिवाराला झाले. परंतु तितकेच गर्व होत असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांचे आई, पत्नी, 2 मुले पुण्यात होते. लॉकडाउन असल्याने त्यांना घरी कसे येता येईल याची चिंता होती. मात्र, संबधित विभागाने शहीद कुटुंबातील व्यक्तींना 19 एप्रिल रोजी विशेष बसने पातुर्डा येथे पोहोचवून दिल्याची माहिती मिळाली आहे.

युवकांनी गाव केले स्वच्छ
पातुर्डा गावात शहीद चंद्रकांत भाकरे यांचे पार्थिव दाखल होणार आहे. त्या निमित्त गावात युवकांनी संपूर्ण गाव स्वच्छ केले आहे. प्रत्येकाच्या मनात शहीद चंद्रकांत यांच्याबद्दल देशाभिमान दिसून येत आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकानही बंद ठेवण्यात आली आहेत. आज संपूर्ण पातुर्डा गाव शांत दिसत आहे. 

तगडा पोलिस बंदोबस्त तगडा
दहशतवादी हल्ल्यात पातुर्डा येथील जवान शहीद झाल्याने त्यांचे पार्थिव आज 19 एप्रिल रोजी गावात येणार आहे. यासाठी गावात तगडा पोलिस बंदोबस्त दिसून येत आहे. भूषण गजानन रोठे यांच्या शेतात शहीद जवानाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांची पाहणी करताना तामगाव पोलिस ठाणेदार भूषण गावंडे, एपीआय श्रीकांत विखे, राजू पाटील हे उपस्थित होते. श्रीनगर वरून दिल्ली, दिल्ली वरून स्पेशल विमानने नागपूर आणि तिथे त्यांच्या बटालियनला घेऊन जातील व तेथून त्यांच्या गाडीने पातुर्डा येथे पार्थिव आणण्यात येईल.

loading image