esakal | यवतमाळ, अकोल्याच्या सटोडीयांचे अमरावतीत स्ट्राँग नेटवर्क
sakal

बोलून बातमी शोधा

Cricket betting and Five arrested with flat owner

बऱ्याच दिवसानंतर आयपीएल सट्टयावर पैसे उधळणाऱ्यांविरुद्ध फसवणूक, विश्वासघातप्रकरणी कलमान्वये गुन्हे दाखल झाले. भारतीय टेलिग्राम कायद्याच्या सहकलमांचाही त्यात वापर झाला. घटनास्थळी गंभीर बाबी सापडल्याची पुष्टी विश्वसनीय सूत्रांनी केली.

यवतमाळ, अकोल्याच्या सटोडीयांचे अमरावतीत स्ट्राँग नेटवर्क

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती : आयपीएल क्रिकेट सट्टयावर कोट्यवधींची उधळण जिल्ह्यात सुद्धा सुरूच आहे. यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील सटोडीयांनी अमरावती ठाण मांडल्याचे दिसून येते. शहराच्या साईनगर जवळच्या विश्रामनगरात गुन्हेशाखेने एका फ्लॅटमालकासह चार सटोडीये अशा पाच जणांना अटक केली आहे. संबंधितांविरुद्ध खोलापुरीगेट ठाण्यात फसवणूक, विश्वासघातासह जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश सुगनचंद कटारिया (वय ४१, रा. वैद्यनगर, यवतमाळ), आकाश राजू विरखेडे (वय २४, रा. एकतानगर, यवतमाळ), अविनाश विजयकुमार प्रेचंदाणी (वय ४६, रा. सिंधीकॅम्प, यवतमाळ) सह राजकुमार गेही (वय ४०, रा. सिंधीकॅम्प, अकोला) अशी अटक सटोडीयांची नावे आहे.

फ्लॅट सुरेश महादेव अवघड यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यांनाही आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी अटक करण्यात आली. घटनास्थळावरून ५६ हजार ४६० रुपयांची रोख रक्कम, ४३ हजारांचे १२ मोबाईल, जुगाराची सामुग्री व जुगार खेळणा-यांच्या वाहतुकीसाठी वापरात असलेली एमएच २९ बीपी ००९० क्रमांकाची दुचाकी व एमएचस २९ एई २२२९ क्रमांकाची ५ लाख ३० हजारांचे वाहन, सट्ट्यावर आकडेमोड बघण्यासाठी वापरात असलेली लॅपटॉप, एलइडी असा एकूण ६ लाख ६५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

आयपीएल सट्ट्यात फसवणुकीचे कलम

बऱ्याच दिवसानंतर आयपीएल सट्टयावर पैसे उधळणाऱ्यांविरुद्ध फसवणूक, विश्वासघातप्रकरणी कलमान्वये गुन्हे दाखल झाले. भारतीय टेलिग्राम कायद्याच्या सहकलमांचाही त्यात वापर झाला. घटनास्थळी गंभीर बाबी सापडल्याची पुष्टी विश्वसनीय सूत्रांनी केली.

संपादन - नीलेश डाखोरे