Crime News : अल्पवयीन मुलीचा हात पकडून म्हटले, मुझसे बात कर..; चॅटिंगनंतर बोलणे बंद केल्याने...

Crime News
Crime Newssakal

अमरावती : पाण्याची कॅन घेऊन येणाऱ्या युवकासोबत (वय १९), एका अल्पवयीन मुलीची (वय १४) ओळख झाली. त्याने रस्त्यात तिचा हात पकडून म्हटले मुझसे बात कर. माहुली जहाँगीर ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Crime News
Sharad Pawar : "मी गेलो नाही याचं समाधान वाटतंय…"; पवारांची संसद उद्घाटन सोहळ्यावर जोरदार टीका

ओळख झाल्यानंतर त्यांनी एकमेकांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर बोलने सुरू केले. त्यानंतर इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईडवरून दोघांमध्ये बरेच दिवस चॅटिंग सुरू होती. काही दिवसांनी अल्पवयीन मुलीने युवकासोबत बोलणेच बंद केले.

त्यानंतर संशयित युवकाने त्याच्यासोबत मुलीने बोलावे म्हणून ती शाळेत किंवा शिकवणी वर्गाला जात असताना काही दिवसांपासून तिचा पाठलाग सुरू केला होता. एकदा संशयित युवकाने ती शिकवणी वर्गाला जात असताना रस्त्यात अडवून तिचा हात पकडला. त्याच्यासोबत का बोलत नाही म्हणून युवकाने जाब विचारून तिची छेड काढली.

Crime News
Santosh Bangar: 'टीका करणाऱ्यांना ठेचण्याचं काम...', संतोष बांगरांची जीभ घसरली

त्यावरही समाधान न झाल्याने वारंवार अल्पवयीन मुलीच्या घरासमोर जाऊन तिला अश्लील शिवीगाळ केली, असा आरोप पीडित मुलीने तक्रारीत केला आहे. त्याआधारे माहुली जहाँगीर पोलिसांनी संशयित युवकाविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com