Crime News : यवतमाळात मटण विक्रेत्याचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News yavatmal Murder of mutton seller police

Crime News : यवतमाळात मटण विक्रेत्याचा खून

यवतमाळ : मटण विक्रेत्याचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता. नऊ) सायंकाळच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्राच्या मागील परिसरात उघडकीस आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पंकज उर्फ लल्ला अशोक कराळे (वय २६, रा. बांगरनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी सनखी नामक तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाघापूर नाक्यावरील पिंपळगाव रोडवर केव्हीकेच्या समोर मटन विक्रीचे दुकान आहे.

सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान केव्हीकेच्या शेतात एक मृतदेह काही लोकांना आढळला. त्यानंतर अवघ्या काही वेळात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

केव्हीकेचे शेत ओसाड आहे. त्यामुळे सध्या हे शेत गुन्हेगारी व आक्रमक प्रवृत्तीच्या तरुणांचा अड्डा बनल्याचे सांगितल्या जाते. पंकजत्याच शेतात पार्टीसाठी गेला होता. सकाळपासून त्याची दुचाकी मटन विक्रीच्या दुकानापुढेच उभी होती,

मृताच्या छातीवर धारदार वस्तूने वार केल्याचे आढळून आले.मात्र, खुनाचे खरे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. पुढील तपास लोहारा पोलिस करीत आहे. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :policecrimemurdervidarbha