पहिल्या लग्नाबाबत दुसरीला कळले आणि उडाला गोंधळ, वाचा दोन बायकांच्या दादल्याची फजिती  

Crime of tyranny against the husband of two wives
Crime of tyranny against the husband of two wives

अमरावती  : नवरा बायकोच्या नात्यात विश्वास सर्वात महत्वाचा असतो. परंतु या विश्वासालाच तडा गेला तर नाते टिकून राहूच शकत नाही. त्यातच प्रश्न जर पती-पत्नीच्या संबंधांचा असेल तर वाद विकोपाला जाऊन नातं मोडकळीस यायला वेळ लागत नाही. पतीच्या पहिल्या लग्नाबाबत दुसरीला आणि दुसऱ्याबाबत पहिलीला कळल्यावर पतीची कशी फजिती होते, ते सांगताच येत नाही. 
  
आधीच विवाहित असल्याची माहिती लपवून ठेवत दुसरीसोबत संसार थाटणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले. दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी दोन बायकांच्या दादल्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. अमरावतीत घडलेल्या या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा आहे. 

नियामत खान साहेब खान पठाण, (रा. बडनेरा), असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडितेचे लग्न रीतिरिवाजाप्रमाणे नियामत खान सोबत झाले. त्यानंतर नियामत खानचा दुसऱ्या पत्नीसोबत संसार सुरू झाला. ज्याच्यावर विश्‍वास ठेवला, त्याचे पहिले लग्न झाल्याची माहिती दुसऱ्या पत्नीला समजली. त्यामुळे तिचाही पारा चढला. त्यानंतर तिने नियामत खान सोबत संबंध तोडले. त्यांच्यात वाद सुरू झाले. 

त्यानंतरही दुसऱ्या पत्नीकडे जाऊन त्याने बळजबरीने अत्याचार केला, असा आरोप पीडितेने बडनेरा ठाण्यात दाखल तक्रारीत केला. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी नियामत खान विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या पत्नीने आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्याचे कळताच नियामत खान फरार झाला. बुधवारपर्यंत (ता. दोन) त्याला अटक झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

चार घरफोड्यांत लाखोंचा ऐवज लंपास

अमरावती शहरात घरफोडी तसेच चोरीच्या चार घटनांमध्ये एक लाख 57 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कोतवालीसह नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. कोतवाली ठाण्याच्या हद्दीत राहणारी महिला कौटुंबिक कामासाठी माहेरी गेली होती. मंगळवारी (ता. एक) घरी परतली असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दोन कपाट फोडून 10 ग्रॅम सोन्याचा गोफ, 5 ग्रॅमची अंगठी, 20 ग्रॅमचे मिनी मंगळसूत्र असे 35 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत एक लाख रुपये) ऐवज लंपास केला. दुसरी घटना कॉसमॉस बॅंक सहकार भुवन परिसरात घडली. एक महिला लॉकरमध्ये सोने ठेवण्यासाठी मुलासोबत जात होती. परिसरातील स्वच्छतागृहात जाण्यापूर्वी तिने दागिने असलेली पर्स बेंचवर ठेवली. तेवढ्यात दागिन्यांची पर्स कुणीतरी चोरली. महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला. नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीत आझाद कॉलनीत इद्रिस खान अताउल्ला खान (वय 38) यांच्या घरात घुसून कुणीतरी 15 हजार रुपयांची रोख रक्कम, पत्नीच्या पर्समधील रोकड व एक मोबाईल,  असा 22 हजारांचा ऐवज लंपास केला. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत मार्डी मार्गावरील कॉलनीत पंडित ज्योतीराम मोरे (वय 45) यांच्या घराच्या आवारातून 15 हजार रुपयांची वॉशिंगमशीन चोरी गेली. 

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com