जहाल नक्षली दाम्पत्याचे आत्मसमर्पण; दोघांवर होते १२ लाखांचे बक्षीस

आत्मसमर्पित कोलू पदा हा सप्टेंबर २०१० रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर २०११ ते २०१७ पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचा सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता.
crime update Jahal Naxalite couple surrenders prize of Rs 12 lakh Gadchiroli
crime update Jahal Naxalite couple surrenders prize of Rs 12 lakh GadchiroliNaxal Flint

गडचिरोली : बारा लाखांचे बक्षीस असलेले नक्षलवादी कोलू ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा ( वय २७, रा. वक्कुर, पो. स्टे. कोयलीबेडा, ता. आरेच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी (वय ३०, रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली, जि. गडचिरोली) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. गुरुवारी (ता. १२) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

आत्मसमर्पित कोलू पदा हा सप्टेंबर २०१० रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर २०११ ते २०१७ पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचा सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर जुलै २०१७ ते डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी क्र. १० मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. कोलू पदा याच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. अवालवरसे (छ.ग.), महाराष्ट्रामधील झारेवाडा, पोयारकोठी अॅम्बुशमध्ये व ओडिशामधील गुंडापुरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये पदा याचा सहभाग होता. कोलू पदा याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये २०२० रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पोयारकोठी जंगल परिसरात एक पोलिस अधिकारी व एक पोलिस जवान शहीद झाला होता.

महिला नक्षली राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी फेब्रुवारी २०११ मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती. तिच्यावर खून, चकमक, जाळपोळ असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. २०१९ रोजी मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे याच्या खुनात तिचा सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने कोलू पदावर ८ लाख तर राजे उसेंडी हिच्यावर ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

पुनर्वसनासाठी मिळणार शासनाची मदत

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता शासनाकडून कोलू पदा यास साडेतीन लाख रुपये तसेच राजे उसेंडी हिला अडीच लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. पती-पत्नीने एकत्रित आत्मसमर्पणानंतर अतिरिक्त १.५० लाख असे एकूण ७.५० लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

२०१९ ते २०२२ मध्ये आतापर्यंत ४७ माओवाद्यांनी तर २०२२ या चालू वर्षात दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील तर त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल.

- अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com