Crime News: समृद्धी महामार्गावर पिस्तूल व जिवंत काडतुसांसह आरोपीला अटक
Khalegaon News: बीबी पोलिसांनी समृद्धी महामार्गावर खळेगावजवळ उत्तर प्रदेशचा हिस्ट्रीशीटर आरोपी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसेसह अटक केली. आरोपी पुण्यासाठी आयशर ट्रकवर माल घेऊन जात होता.
बीबी : बीबी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर खळेगाव नजीक नागपूर मुंबई लेनवर संशयास्पदरीत्या थांबलेल्या कंटेनर चालकाजवळ एक पिस्टलसह चार जिवंत काडतूस आढळून आले.