esakal | 'माझे नाव पोलिसांना विचारा' म्हणत गावगुंडांची नागरिकांवर सर्रास दादागिरी; अमरावतीत हैदोस 
sakal

बोलून बातमी शोधा

दबाव टाकण्यासाठी तुम्ही मला ओळखत नाही का? माझे नाव पोलिसांना विचारा, मी कोण आहे ते? असे म्हणून ते व्यक्ती निघून गेले. 

दबाव टाकण्यासाठी तुम्ही मला ओळखत नाही का? माझे नाव पोलिसांना विचारा, मी कोण आहे ते? असे म्हणून ते व्यक्ती निघून गेले. 

'माझे नाव पोलिसांना विचारा' म्हणत गावगुंडांची नागरिकांवर सर्रास दादागिरी; अमरावतीत हैदोस 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती: आपल्या पेक्षा कमकुवत लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर केल्या जातो. एकाने स्वत:ची ओळख सांगून प्रभाव टाकण्यासाठी पोलिसांनाच विचारा मी कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला.

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण करा; आमदारांसह संघटनांची मागणी

याप्रकरणी संशयित आरोपी कुंदन शिरकरे, गौरव नंदकिशोर तायडे, आदित्य धर्मराज शंभरकरसह अन्य दोघे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले. त्यापैकी गौरव तायडे यास पोलिसांनी अटक केली. कांबळे ले-आउट मनकर्णानगर येथे प्रभाकर रामभाऊ घोडेस्वार (वय 67) यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. 

कुंदन व गौरव यांनी पाण्याची बॉटल विकत घेतली. बॉटल घेऊन परत जात असताना कुंदन हा घोडेस्वार यांच्या घरासमोरील पोर्चवर थुंकला. त्यामुळे त्यांच्या लहान मुलाने कुंदन याला हटकले असता त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने शिवीगाळ केली व वाद घातला. घोडेस्वार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तुम्ही मला ओळखत नाही का? माझे नाव पोलिसांना विचारा, मी कोण आहे ते? असे म्हणून ते व्यक्ती निघून गेले. 

टाळेबंदी विरोधात व्यापारी एकवटले; मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून दर्शविला विरोध

त्यापूर्वी दारावर दगडफेक केली. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. असा आरोप श्री. घोडेस्वार यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image