श्‍वानांकडून पिकांची सुरक्षा; शेतकऱ्याने केला वाढदिवस साजरा

 dogs
dogs dogs

यवतमाळ : आधुनिकीकरण व धावपळीच्या युगात माणूस प्रिय व्यक्ती, इष्टमित्रांचा वाढदिवस, लग्न अथवा छोटेमोठे कार्यक्रम विसरतो. इतकेच नव्हे, तर जाणेही टाळले जाते. माणसा-माणसांमधील नाते हरविले जात आहे. अशाही परिस्थितीत प्राणीमात्रा माणसांची इमान राखून आहेत. संकटात मालकाला दिलासा देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. श्‍वानांनी शेतपिकांची सुरक्षा केल्याने होणारे नुकसान टळले. त्यातून उतराई होण्यासाठी कुटुंबातील सदस्य म्हणून शेतकऱ्याने चक्क राणी व बसंतीचा वाढदिवस साजरा केला.

शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून यवतमाळ तालुक्यातील बोथबोडणची ओळख आहे. याच गावात कवडू शेळके यांचे वास्तव्य असून, कुटुंबात पत्नी व दोन मुले आहेत. शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांची शेती जंगलाला लागून असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात होती. पिकांच्या रखवालीसाठी मजूर मिळत नसल्याने त्यांनी शेतात दोन श्‍वान ठेवले.

 dogs
कन्हान नदीत तिघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दोघे बेपत्ता

मोठ्या लाडाकौतुकाने त्यांचे नाव राणी व बसंती ठेवले. ही दोन्ही श्‍वान शेतात दिवसरात्र राहतात. अनोळखी कुणालाही आत येऊ देत नाहीत. शेताला कुंपण नसतानाही पिकांची सुरक्षा करतात. त्यामुळे दोन वर्षांत शेतकरी शेळके यांच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. शेळके यांच्या घरी जे अन्न शिजते. तेच राणी व बसंतीला सकाळी, सायंकाळी दिले जाते.

दोन्ही श्‍वान शेळके यांच्या कुटुंबातील जणूकाही सदस्यच बनले आहेत. या प्रेमाची जाण ठेवत शेतकऱ्याने सगळ्यांना आश्‍चर्य वाटेल असा उपक्रम हाती घेतला. दोन्ही श्वानांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आपल्या शेतातच साजरा केला. या आनंदात सहभागी होण्यासाठी गावालाही निमंत्रण देण्यात आले. गल्ली-बोळात भाई व नेत्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचे फलीत काय मिळत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा आगळा वेगळा वाढदिवस कौतुकाचा आणि औत्सुक्याचा विषय ठरला.

 dogs
फॅट-शेमिंगच्या बळी ठरल्या या टीव्ही अभिनेत्री
जंगलाशेजारी शेत असल्याने वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान केले जात होते. दोन वर्षांपूर्वी दोन श्‍वानांचे पिल्ले आणले. तीच पिल्ले मोठी झाली असून, आता पिकांची सुरक्षा करतात. श्‍वान शेतात राबत असल्याने आम्हाला दिलासा मिळाला. शेताला कुंपण नसतानाही दिवसभर राबतात. त्यांच्यामुळेच होणारे नुकसानही कमी झाले आहे.
- कवडू शळके, शेतकरी, बोथबोडण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com