अहेरी येथील सीआरपीएफ जवानाचा दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

आनंद बासुमतारी (उपनिरीक्षक जीडी )या जवानाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर दिल्लीत उपचार केल्यावर त्याला हरियाणा येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था झज्जर येथे रेफर करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान आनंद बासुमतारी यांचा 28 जूनला मृत्यू झाला.

अहेरी (जि.गडचिरोली) :  अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात केंद्रीय राखीव पोलिस बल 9 बटालियनचा कॅंप आहे. येथील जवानांच्या तुकड्या दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील पेरमीली, ताडगाव, रेपनपल्ली, बुर्गी, आलदंडी तसेच दिल्ली व जम्मू काश्‍मीरमध्ये तैनात आहेत.

महाराष्ट्रासोबतच कोरोनाचे सर्वात जास्त थैमान दिल्लीत आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध लढण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्‍यातील आलदंडी येथील जवानाची (E) एक तुकडी(कंपनी) दिल्लीला तैनात करण्यात आली होती. या 9 बटालियनचे जवान दिल्लीत लॉ अँड ऑडर सांभाळीत आहेत. याच दरम्यान आनंद बासुमतारी (उपनिरीक्षक जीडी )या जवानाला कोरोनाची लागण झाली. त्याच्यावर दिल्लीत उपचार केल्यावर त्याला हरियाणा येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था झज्जर येथे रेफर करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान आनंद बासुमतारी यांचा 28 जूनला मृत्यू झाला.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे यांनी या वादाविषयी केला मोठा खुलासा...

केंद्रीय रिझर्व्ह पोलिस बल 9 बटालियनच्या वतीने अहेरी येथील प्राणहिता मुख्यालयात गुरुवारी वीर कोराना योद्धा शहीदाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बटालियनचे मुख्य कमांडेट रविंद्र भगत उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CRPF Jawan died in Delhi due to corona