विद्यार्थ्यांत रमले विदेशी पाहुणे; प्रश्नांची दिली.दिलखुलासपणे उत्तरे

सुधीर बुटे
Saturday, 16 November 2019

विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वातावरण, शिक्षण व्यवस्था, प्राणी, पक्षी, भाजीपाला, करिअर, सांस्कृतिक व ऐतिहासिक माहिती आदी विषयावर प्रश्न विचारली. त्या सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे दिली.

काटोल, (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड व पारशिवनी तालुक्‍यातील विद्यार्थ्यांशी अमेरिका व आफ्रिकी देशातून आलेल्या शिष्टमंडळाने संवाद साधला. युनिस्कोच्या "कल्चरल एक्‍स्चेंज' कार्यक्रमातर्गंत परदेशी शिक्षणतज्ज्ञांचे शिष्टमंडळ भारतातील शिक्षणाची माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांनी या विदेशी पाहुण्यांसोबत मस्ती केलीच शिवाय अनेक नव्या गोष्टीही त्यांच्याकडून शिकल्या. 

काटोल तालुक्‍यातील आलागोंदी जिल्हा परिषद शाळा व नरखेड तालुक्‍यातील थुगाव निपानी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शाळाबाह्य विद्यार्थी, पालक व गावकरी याच्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटीमुळे कुतूहल वाढले होते. याच सोबत बालकदिनी थेट अमेरिकेतून काटोल नरखेड तालुक्‍यातील अनुक्रमे आलागोंदी व थुगाव निपाणी येथील विद्यार्थ्याशी शिक्षण तज्ञांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वाद साधला. काटोल तालुक्‍यात कार्यरत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थाद्वारा विविध गावांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. यानिमित्त विदेशी पाहुण्यांनी भेटी देऊन विद्यार्थी, गावकरी यांचेशी हितगुज साधून त्यांना प्रोत्साहित केले. 

विदेशी पाहुण्यानी आढावा घेतला.
तालुक्‍यातील 30 गावांमध्ये "आमचे गाव' उपक्रम राबवले जात आहे. उपक्रमात मुलांना स्वयंअध्ययनाची सवयी लावून शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचे प्रवाहात आणणे. प्राथमिक शाळेतील माता-पालकांना सहभागी करून गावाचा शैक्षणिक स्तर उंचावणे याकरिता विदेशी पाहुण्यानी आढावा घेतला. उच्च प्राथमिक विध्यार्थ्यांना टॅबच्या माध्यमातून इंग्रजी, गणित व विज्ञान आदी विषयाचे धडे दिले. 

शैक्षणिक विचारांची देवाण-घेवाण 
मूळच्या भारतीय व शैक्षणिक संशोधन कार्यासाठी अमेरिकेत असणाऱ्या डॉ. संगीता तोडमल यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शैक्षणिक संवाद साधला. भारतीय व अमेरिकन शिक्षणात मूलभूत फरक स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वातावरण, शिक्षण व्यवस्था, प्राणी, पक्षी, भाजीपाला, करिअर, सांस्कृतिक व ऐतिहासिक माहिती आदी विषयावर प्रश्न विचारली. त्या सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे दिली. अमेरिका व भारतीय संस्कृतीची देवाण-घेवाण झाल्याचे मत थुगांव (निपाणी) शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे व आलागोंदी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे यांनी व्यक्त केले. 

डोरली, इटगाव शाळेलाही दिली भेट 
पारशिवनी तालुक्‍यातील डोरली व इटगावच्या शाळेत व अंगणावाडी केंद्रात विदेशी पाहुणे पोहोचल्याने विद्यार्थी व शिक्षकांत उत्साह होताच, मात्र गावकऱ्यांमध्येही या भेटीविषयी उत्सुकता लागली होती. दक्षिण आफ्रिकेतील बोस्टनच्या यंग लव्ह या संस्थेने शिक्षणविषयक माहिती जाणून घेतली. विद्यार्थी यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत विद्यार्थी व शिक्षक, पालक व ग्रामपंचायत सरपंच यांच्या सोबतही चर्चा केली. मागील वर्षी विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी ही शाळा दत्तक घेतली होती. शाळेच्यावतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पाहुण्यांनी त्यांचे नृत्य करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cultural exchange program in nagpur district