esakal | कुंभी वाघोलीचे सीताफळ वन बहरले; तीन वर्षांपूर्वी लागली होती आग
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी वाघोलीचे सीताफळ वन बहरले; तीन वर्षांपूर्वी लागली होती आग

कुंभी वाघोलीचे सीताफळ वन बहरले; तीन वर्षांपूर्वी लागली होती आग

sakal_logo
By
आनंद चिठोरे

पथ्रोट (जि. अमरावती) : कुंभी वाघोली येथील सीताफळ बनात तीन वर्षांपूर्वी आग लागली होती. आगीमध्ये शेकडो हेक्टरवरील सीताफळांची झाडे नष्ट झाले होते. आता पुन्हा हे बन बहरले असल्याने आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

कुंभी वाघोली हे गाव वनविभागाने वनग्राम म्हणून घोषित केल्यानंतर तेथील युवकांना सोबत घेऊन वनग्राम समिती स्थापन केली व ९८ हेक्टर जंगल समितीच्या ताब्यात देण्यात आले. ज्यामध्ये ३० हेक्टरवर सीताफळांची झाडे आहेत. त्यावर हंगामात भरपूर उत्तम दर्जाची फळे येतात. परिपक्व सीताफळे वनग्राम समितीचे सदस्य स्वतः तोडून व्यवस्थित बॉक्स पॅकिंग करून मुंबई, नागपूर, अकोला व दर्यापूरच्या बाजारपेठेत रोजच विक्रीसाठी पाठवीत होते.

हेही वाचा: आता थ्री-डी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाईस करणार लठ्ठपणा कमी

त्या ठिकाणी सीताफळांना चांगला भाव मिळत होता. या रकमेतून सीताफळे तोडण्याची मजुरी देऊन उर्वरित हिशेब ग्रामसभेच्या पुढे ठेवून गाव विकासाकरिता खर्च करण्यात येत होता. परंतु, दुर्दैवाने तीन वर्षांपूर्वी सदर बनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये सीताफळांची अनेक झाडे जळून राख झाली होती. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या झाडांना व्यवस्थित फळ येत नसल्याने तेव्हापासून रोजगार थांबलेला होता. परंतु, यावर्षी निसर्गाची चांगली साथ लाभल्याने सदरचे बन पुन्हा फळांनी बहरले आहे.

साडेपाच हजार रोपे नव्याने लावली

तीन वर्षांच्या कालावधीमध्ये वनग्राम समितीच्या आदिवासी युवक सदस्यांनी खोज संस्थेकडून मिळालेल्या साडेपाच हजार सीताफळांची रोपे नव्याने लावली आहेत. यासाठी पाण्याचेही व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून बुडालेला रोजगार यावर्षी उपलब्ध होणार असल्याने वनग्राम समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

loading image
go to top