esakal | आता थ्री-डी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाईस करणार लठ्ठपणा कमी
sakal

बोलून बातमी शोधा

आता थ्री-डी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाईस करणार लठ्ठपणा कमी

आता थ्री-डी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाईस करणार लठ्ठपणा कमी

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : लठ्ठपणामुळे शरीरयष्टीचा आकार बिघडते. लठ्ठपणा ही सध्या गंभीर समस्या बनत चालली आहे. ही समस्या केवळ प्रौढ व्यक्तींमध्येच नाही तर तरुणाईला भेडसावत आहे. यामुळे अनेक आजार जडतात. लठ्ठपणावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी आहार विहार महत्त्वाचा ठरतो. त्याच्या जोडीला आता शरीराला सुंदर आकार देण्यासाठी वेलनेस उपकरण थ्री-डी बॉडी कॉन्टोरिंग डिव्हाईस हे यंत्र भारतात प्रथम नागपुरात दाखल झाले आहे. याद्वारे लठ्ठपणासह त्वचेची लवचिकता आणि स्नायूंचे टोनिंग होणार असल्याचा दावा एस्थेटिक क्लिनिकच्या डॉ. आसरा खुमुशी यांनी केला आहे.

इनमोड इंडिया ही इनमोड लिमिटेड, इस्राईलच्या मालकीची जगातील दुसऱ्या क्रमांकाची एस्थेटिक डिव्हाइस कंपनी आहे. मानवाला स्लिम आणि कॉन्टूर्ड बॉडीची गरज लक्षात घेत हे उपकरण तयार केले आहे. शरीरावरील चरबी कमी केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आरोग्यदायी राहते. मजबूत बनण्यासोबतच सांधे देखील आरोग्यदायी बनतात. मांसपेशीचे आरोग्य चांगले राहिले तर शरीरामध्ये रक्ताचे संचलन उत्तमप्रकारे होते, असे डॉ. खुशुमी म्हणाल्या.

हेही वाचा: गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविताना मूर्तिकाराचा मृत्यू

थ्रीडी बॉडी कॉन्टोरिंगमुळे शरीराला बळकटी मिळते. शरीराचे आरोग्य सुधारते. पुढील पिढीचे तंत्रज्ञान आणि ब्लॉक बस्टर ब्रँड्स जसे बॉडीटाइट, मॉफ्रेस ८, ट्रायटन, फॉर्मा, ल्युमेका, इव्हॉल्व्ह आणि इव्होक दिले जातात. ही थेरपी घेतल्यास तुमचे रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात राहील. एक थेरपीने अर्धा इंचाहून अधिक लठ्ठपणा कमी होईल. मात्र, सोबत आहार विहार योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.
- डॉ. आसरा खुमुशी
loading image
go to top