विदर्भातल्या 'या' मंदिरात आजपासून किरणोत्सव ; १५ मेपासून सलग पाच दिवस अनुभवायला मिळणार अनमोल ठेवा

Kiranotsav Begins at Daityasudan Temple : सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन दैत्यसूदन मंदिर. तब्बल १००० वर्ष जुने असलेले हे मंदिर शहराचा एक अनमोल ठेवा आहे.
Kiranotsav Begins at Daityasudan Temple

Kiranotsav Begins at Daityasudan Temple

Esakal

Updated on

लोणार : लोणार शहर पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध लोणार सरोवरात आणि सभोवताली खूप प्राचिन मंदिरे आढळून येतात, त्यातीलच एक आहे. सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन दैत्यसूदन मंदिर. तब्बल १००० वर्ष जुने असलेले हे मंदिर शहराचा एक अनमोल ठेवा आहे. या मंदिराची कलाकुसर थेट कोनार्कच्या सूर्य मंदिराशी मिळती जुळती असलेली आढळून येते. भगवान विष्णूंच्या दैत्य सुधन अवतारला समर्पित असलेले हे मंदिर बघण्यासाठी पर्यटकांची नियमित वर्दळ असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com