esakal | नुकसानीचे पाहणी करण्यासाठी निघालेल्या खासदार राणांनी घेतला चहा पिण्याचा आनंद
sakal

बोलून बातमी शोधा

पाहणीसाठी निघालेल्या खासदार राणांनी घेतला चहा पिण्याचा आनंद

पाहणीसाठी निघालेल्या खासदार राणांनी घेतला चहा पिण्याचा आनंद

sakal_logo
By
अरुण जोशी

अमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नदीनाल्यातील पाणीपातळी वाढली असून, मेळघाटातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत बुधवारपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. झालेल्या नुकसानीची खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी चहाचपरीवर चहा पिण्याचा आनंद घेतला. (Damage-to-agriculture-due-to-rains-Navneet-Rana-Inspection-tour-Tea-nad86)

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पिली, पेढी, पूर्णा, शहानूर या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाने दिलेल्या संततधार हजेरीने नदी नाल्यांना आलेला पूर शुक्रवारी उघाड दिल्याने ओसरला. मेळघाटातील धारणी तालुक्यात गुरुवारी अतिवृष्टी झाली असून त्याखालोखाल चिखलदरा ४० मि.मि व संत्रा पट्ट्यातील वरूड तालुक्यात ३६.२ मि.मि. पाऊस झाला.

हेही वाचा: पॉर्न सर्चिंग : पुणे पहिल्या, नाशिक दुसऱ्या तर नागपूर तिसऱ्या क्रमांकावर

जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. खासदार नवनीत राणा शनिवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी निघाल्या. त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना शेतकऱ्यांना धीर दिला.

शनिवारी सकाळपासून अमरावती जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. अशा परिस्थितीतही खासदार राणा यांनी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पावसात चहा पिण्याच्या आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी ही पावसाचा आनंद घेत टाकरखेडा शंभू या गावात एका चहा टपरीवर चहाचा आस्वाद घेतला. यावेळी दरम्यान त्यांनी शेकऱ्यांसोबत संवाद ही साधला.

हेही वाचा: अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

चोवीस तासांतील पाऊस

तालुका पाऊस (मि.मि.)

 • धारणी 81.6

 • चिखलदरा 40.3

 • अमरावती 19.6

 • भातकुली 13.2

 • नांदगाव खंडेश्वर 18.3

 • चांदूर रेल्वे 20.9

 • तिवसा 30.7

 • मोर्शी 33.2

 • वरूड 36.2

 • दर्यापूर 17.7

 • अंजनगावसुर्जी 28.3

 • अचलपूर 32.2

 • चांदूर बाजार 25.1

 • धामणगावरेल्वे 28.7

(Damage-to-agriculture-due-to-rains-Navneet-Rana-Inspection-tour-Tea-nad86)

loading image
go to top