esakal | Video : "रिमिक्‍स' गाण्यांवर नृत्यातून "फिटनेस'चा मंत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

Dance for fitness at nagpur

ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे सध्या फिटनेसवर प्रत्येकजण भर देत आहे. कुणी उद्यानांमध्ये तर कुणी "जिम'मध्ये सकाळ, सायंकाळी व्यायाम करताना दिसून येत आहे. मात्र, जिमला जाऊन तोच तो व्यायाम करण्यापेक्षा नृत्यातून मिळणारा आनंद शरीराबरोबर मनालाही फिट ठेवत असल्याने अनेकजण आता नृत्याकडे वळत आहे. 

Video : "रिमिक्‍स' गाण्यांवर नृत्यातून "फिटनेस'चा मंत्र 

sakal_logo
By
राजेश प्रायकार

नागपूर : सध्या "डान्स फॉर फिटनेस' हा ट्रेंड जोरदार सुरू आहे. फिटनेससाठी विविध डान्स क्‍लासेस उपलब्ध असले तरी काही संस्थांनी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केल्याने महिला, पुरुषांची गर्दी दिसून येत आहे. वेगवेगळ्या भावनांच्या जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर थिरकणारे चिमुकले पाय तसेच ज्येष्ठ नागरिकही ठेका धरून "फिटनेस' कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. डान्समुळे उत्साह आणि स्फूर्तीचा अनुभव अनेकजण घेत आहेत.

चिमुकले, ज्येष्ठ महिलांचा उत्साह

ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे सध्या फिटनेसवर प्रत्येकजण भर देत आहे. कुणी उद्यानांमध्ये तर कुणी "जिम'मध्ये सकाळ, सायंकाळी व्यायाम करताना दिसून येत आहे. मात्र, जिमला जाऊन तोच तो व्यायाम करण्यापेक्षा नृत्यातून मिळणारा आनंद शरीराबरोबर मनालाही फिट ठेवत असल्याने अनेकजण आता नृत्याकडे वळत आहे.


हेही वाचा - ब्रेन फिटनेससाठी काय करावे?

शरीरासोबत मनही झाले तरुण

शहरात मोठ्या प्रमाणात डान्स क्‍लास सुरू आहे. यासाठी प्रतिमहिना नृत्य शिक्षकाला मानधन द्यावे लागते. याशिवाय जागेचीही मर्यादा असल्याने बहुतांश जण डान्स क्‍लासला जाणे टाळत आहे. अशा नागरिकांसाठी उद्यानांमध्ये निःशुल्क डान्स सुरू केला आहे. विशेष म्हणजे जुन्या गीतांच्या "रिमिक्‍स'वर नृत्य दत्तात्रयनगर उद्यानात फिरण्यास येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेच, शिवाय नागरिक आता या नृत्य ग्रुपशी जुळत आहेत. 

28 नोव्हेंबरपासून नीता सौंधी, मनीष कटारिया, वंदना क्षीरसागर, रेणुका बोबडे यांनी नृत्यातून फिटनेसचा निःशुल्क क्‍लास येथे सुरू केला. सुरुवातीला 30-40 नागरिकानी योग नृत्याचा लाभ घेतला. मात्र, दहा दिवसांमध्येच येथे सुमारे 350 महिला, चिमुकले, पुरुष नृत्य करताना दिसून येत आहे. "रिमिक्‍स'वरील नृत्यातून शंभर टक्के फिटनेस साधल्याचे येथे येणाऱ्या महिलांनी "सकाळ'सोबत बोलताना सांगितले.

जाणून घ्या - मायक्रो मेडिटेशन म्हणजे काय?

केवळ दत्तात्रयनगरच नव्हे तर छत्रपतीनगर, गणेशपेठ, सुयोगनगर, नरेंद्रनगर, मनीषनगर, स्नेहनगर, ओंकारनगर, त्रिमूर्तीनगर, चंद्रमणीनगर, सुर्वेनगर, अभयनगर, पावनभूमी येथे दररोज क्‍लास सुरू असल्याचे रेणुका बोबडे यांनी सांगितले. या भागातील उद्यानांमध्ये याच क्‍लासमधून नृत्याचे धडे घेणाऱ्या कीर्ती प्रतापवार, शीतल खांडरे, सुलेखा खाचणे, मंजूषा जोहारे, मनीष कटारिया, हिमांगी चिंचाळकर, राजेश उमाटे, मनीषा लुतडे, सुनीता सिंह, मीना भुते, वर्षा लुतडे, सलोणी वनकर, कांता मांडवगडे, बाळ शिरपूरकर, अशिवनी मारावार, जया वनमाली, गिरीधर तिवारी, प्रेमइंद्रा ठाकरे, कुंदा पांचुदे, निर्मला तेलरांधे, प्रीती मानकर, विनोद कंदारकर नागरिकांना नृत्यातून फिटनेसचे धडे देत आहेत.

नृत्याने विविध रोगांपासून मुक्तता

नृत्यातून मन निरोगी राहतेच, शिवाय विविध आजारापासूनही मुक्तता मिळत असल्याचे काही महिलांनी नमूद केले. यात वजन कमी होतेच, शिवाय ब्लड प्रेशर, मधुमेह, ऍसिडिटी, अस्थमा, पाईल्स, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, मायग्रेन, शारीरिक व मानसिक फायदा होत असल्याचेही या नृत्याचा लाभ घेणाऱ्या महिलांनी स्पष्ट केले.

चार हजारांवर नागरिक घेत आहेत लाभ
नृत्य केल्याने शारीरिक फिटनेस बरोबर मानसिक फिटनेसही वाढतो. मनाला, मेंदूला स्थैर्य देण्याचे काम नृत्य करीत असते. योग नृत्याची सुरुवात 21 नोंव्हेबर 2017 रोजी गोपाल मुंदडा यांनी चंद्रपुरात केली होती. नागपुरात 15 एप्रिल 2019 पासून कीर्ती प्रतापवार यांनी सुरुवात केली. आज चार हजारांवर नागरिक निःशुल्क लाभ घेत आहेत.
- रेणुका बोबडे, प्रशिक्षक.

loading image