esakal | पुरातन स्थापत्य कलेला पर्यटकांकडून धोका!
sakal

बोलून बातमी शोधा

शेफाली वैद्य

पुरातन स्थापत्य कलेला पर्यटकांकडून धोका!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पुरातन स्थापत्य शिल्पकलेचा इतिहास असलेल्या देवालयांना भारतीय पर्यटनाचे केंद्र समजतात. मी 21 देश बघितले; मात्र अशी वास्तुकला कुठेही बघितली नाही. ही शिवायले पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच म्हणावा लागेल. ही शिवालये पाहण्यासाठी येणारे पर्यटक वाटेल तसे वावरतात. यामुळे पुरातन स्थापत्य कलेला पर्यटकांकडून धोका असल्याचे मत, प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी व्यक्‍त केले.
मंथनच्या व्याख्यानमालेत शेफाली वैद्य "मंदिरांची वास्तुकला, इतिहास व उत्क्रांती' या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी त्यांनी भारतात विविध काळात बांधलेली शिवमंदिरांच्या बांधणीची माहिती दिली. मंदिरातील गर्भगृह व प्रकार, सभामंडप, कळस व त्यांचे प्रकार, दरवाजे, नकाशे इतकेच काय तर दक्षिणात्य देवालयांमध्ये विद्युत दिवे नसण्याचे तंत्रशुद्ध कारण सांगितले. दक्षिणात्य देवालयांच्या सभामंडपात बसून ध्यान लावले असता अंतरात्म्याची अनुभूती घेता येते. जी साधारणत: विद्युत दिव्यांच्या प्रकाशात मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय पूजा पद्धतीत 16 उपचारांचा समावेश आहे. यात दर्शन, अभिषेक, आरती व प्रसाद हा मुख्य भाग असून, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या 16 उपचारांमागचे वैज्ञानिक कारण सांगून उपस्थितांना आश्‍चर्यचकित केले. प्रसिद्ध हंपीतील दगडी रथ, नरसिंहाची मूर्तीसह भारतातील दुर्मीळ कलांचे दर्शन त्यांनी उपस्थितांना घडवले. संचालन प्रेमलता डागा यांनी केले. सागर मिटकरी यांनी आभार मानले.

loading image
go to top