
गोंदिया : राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त देशातील विविध ग्रामपंचायतींना व तसेच संस्थांना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीचा समावेश असून, हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार २०२३-२४ ने या ग्रामपंचायतीला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.