मुलचेरावासींच्या दिवसाची सुरूवात होते राष्ट्रगीताने

दररोज सर्व नागरिक होतात सहभागी : गडचिरोली पोलिस प्रशासनाचा पुढाकार
day of people of Mulchera begins with national anthem Gadchiroli
day of people of Mulchera begins with national anthem Gadchirolisakal
Updated on

गडचिरोली : एकीकडे गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असला, तरी या जिल्ह्यात एक गाव असेही आहे जिथे सकाळचा सूर्य देशभक्तीचा मंत्र घेऊन उगवतो. कारण या गावातील लोकांच्या दिवसाची सुरूवातच राष्ट्रगीताने होते. पोलीस आणि प्रशासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम मुलचेरा येथे दररोज सुरू आहे.

राष्ट्रगीत सुरू होण्याआधी एखादे देशभक्तीपर गाणं वाजवून मुलचेरा गावात या कार्यक्रमाची सुरुवात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या काही सेकंद आधी देशभक्तीपर गीत वाजते. घड्याळाचा काटा ८ वाजून ४५ मिनिटांवर येताच 'परेड सावधान... एक साथ राष्ट्रगीत सुरू कर' अशी घाेषणा हाेता. हा आवाज मुलचेरामध्ये जिथपर्यंत पोहोचतो तेथील गावकरी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगान सुरू करतात.

यावेळी आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या वाहनांना देखील आपसूक ब्रेक लागून वाहनचालकही उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होतात. राष्ट्रगीत संपले की सगळे 'भारत माता की जय' असा जयघोष करतात आणि त्यानंतर देशाप्रती आपली भावना व्यक्त करून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दुकानदार आपले दुकान उघडतात आणि बाजारपेठा सुरू होतात. मुलचेरा पोलिस स्टेशन येथे काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले ठाणेदार अशोक भापकर यांनी १५ ऑगस्ट २०२२ पासून या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

१५ ऑगस्ट पूर्वीच त्यांनी याविषयी व्यापारी वर्ग, युवा पिढी, तसेच पत्रकार बांधवांसोबत सविस्तर चर्चा करून या उपक्रमाचे नियोजन केले. दररोज सकाळी राष्ट्रगीत गायनाने जनतेमध्ये देशभक्ती वाढेल आणि समाजातही एकोपा निर्माण होईल या उद्देशाने सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले. एखाद्या शाळेच्या किंवा हायस्कूलच्या परिपाठाप्रमाणे मुलचेरा गावाने हा उपक्रम १५ आगस्ट २०२२ पासून अखंड सुरू ठेवला आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून गावात भांडण तंटे कमी होऊन एकोपा वाढला आहे. तसेच गावातील लोकांची काम करण्याची क्षमता आणि उत्साह यामध्येसुद्धा लक्षणीय बदल झाला आहे.

राज्यातील दुसरे गाव...

मुलचेरा गाव तालुका मुख्यालय असू गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत समाविष्ट आहे. हे महाराष्ट्रातील असे दुस-या क्रमांकाचे गाव आहे जिथे राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात होते. या आधी सांगली जिल्ह्यातील भिलवडी आणि तेलंगणा राज्यातील नालगोंडा ह्या गावात या प्रकारे राष्ट्रगीत गायनाने दिवसाची सुरुवात हाेत आहे आता हा सन्मान गडचिरोलीकरांना मिळाला असून ह्या उपक्रमामुळे मुलचेराची लोकप्रियता वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com