'विभोर' व्यसनमुक्ती, पुनर्वसन केंद्र कार्यान्वित; सावंगी (मेघे) येथील रुग्णालयातील मानसोपचार सेवा...

De-addiction, rehabilitation center started sawangi meghe wardha
De-addiction, rehabilitation center started sawangi meghe wardha

वर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील मानसोपचार विभागाद्वारे विभोर व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्‌घाटन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांच्या हस्ते करण्यात आले.

सध्याच्या कोरोनाकाळात व्यसनाधिनतेसोबतच मनोविकारांचे प्रमाणही सतत वाढत चालले आहे. अशावेळी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणाऱ्या आणि व्यसनाधिनतेकडे वळलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रात वैद्यकीय मानसोपचारासोबतच वैयक्तिक, कौटुंबिक व सामूहिक समुपदेशन, ताणतणाव नियोजन, योगा, ध्यानधारणा, म्युझिक थेरपी, संमोहन अशा वैविध्यपूर्ण पद्धतीने भरती रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. याशिवाय, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

या उद्‌घाटन समारोहाला अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, मानसोपचार विभागप्रमुख व केंद्र संचालक डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रकाश बेहरे, डॉ. अनुराग खापरी, डॉ. अनिल नागदिवे, मानसशास्त्रज्ञ सचिन सोनवणे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, पूजा व्यास, स्वप्नील आवळे, सुशांत वानखेडे, मुख्य वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अजय ठाकरे, राजेश गडरिये आदींची उपस्थिती होती.

गांधी जिल्ह्यातही व्यसनमुक्तीची गरज : डॉ. पाटील

गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात दारूबंदी असल्याने व्यसनमुक्ती केंद्राची गरज नाही, असा समज आहे. मात्र, केवळ दारूच नव्हे तर गांजा, अफीम, चरस, धूम्रपान, तंबाखू सेवन याचे प्रमाण सर्वत्रच वाढले आहे. याशिवाय वेदनाशामक पदार्थांचाही वापर व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती करताना दिसतात. 

व्यसनांसोबतच पबजीसारखे खेळ, संचारबंदीच्या काळात उद्‌भवणारे वैफल्य, नैराश्‍य, मानसिक ताणतणाव, त्यातून मनात डोकावणारा आत्महत्येचा विचार, यातून मनोरुग्णांना बाहेर काढण्यासाठी, व्यसनांपासून परावृत्त करीत दिलासा देण्यासाठी अशा समुपदेशन केंद्राची गरज आहे. व्यसनमुक्तीसोबतच व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे हे पुनर्वसन केंद्र स्त्री आणि पुरुष या दोघांसाठीही आहे, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील यांनी यावेळी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com