नातेवाईकाच्या अस्थि विसर्जनासाठी आला अन् वाहून गेला; अखेर आठ दिवसांनी सापडला मृतदेह

अशोक काटकर
Monday, 28 September 2020

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्‍यातील पिंपरी वरघट येथील नातेवाइकाच्या अस्थी विसर्जनासाठी सांगवी(रेल्वे)येथे अजय जनबंधू इतरांसोबत अडाण नदीतीरावर आला होता. अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. मात्र, कुठेही शोध न लागल्याने अखेर दारव्हा पोलिसांत तक्रार दिली होती.

दारव्हा (जि. यवतमाळ): तालुक्‍यातील सांगवी (रेल्वे)येथे नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी आलेला व्यक्ती अडाणनदी तीरावरून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी गेल्या सोमवारी (ता.21)पोलिसांत दिली होती. अखेर पिंजर येथील आपत्कालीन पथकाला तो मृतदेह शोधण्यात यश मिळाले असून अजय श्रीराम जनबंधू (वय 45, रा. पुलगाव), असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा - विलगीकरणामुळे सुनावणी लांबणीवर; जिल्ह्याबाहेर जादा दराने बियाणेविक्री प्रकरण

वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्‍यातील पिंपरी वरघट येथील नातेवाइकाच्या अस्थी विसर्जनासाठी सांगवी(रेल्वे)येथे अजय जनबंधू इतरांसोबत अडाण नदीतीरावर आला होता. अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. मात्र, कुठेही शोध न लागल्याने अखेर दारव्हा पोलिसांत तक्रार दिली. तहसीलदार संजय जाधव व अजयचे नातेवाईक रवींद्र राऊत यांनी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. 

हेही वाचा - ‘नाफेड'च्या कापूस खरेदीसाठी उद्यापासून नोंदणी,...

शनिवारी (ता. 26) सकाळी जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये, अतुल उमाळे, ऋतीक सदाफळे, अजय डाके, कैलास वानखडे, वैभव सदाफळे, मारोती डहाके आदींनी घटनास्थळापासून सर्च शोध मोहीम सुरू केली. दुपारी तीन वाजता घटनास्थळापासून दहा किलोमीटर अंतरावर बोदेगाव शिवारात अडाण नदीमधील काटेरी झाडीत सडलेल्या अवस्थेत अजय जनबंधूचा मृतदेह आढळून आला. यावेळी नातेवाईक विजय जनबंधू, पुलगावचे नगरसेवक कुंदन जांभुरकर, रवींद्र राऊत आदी उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead body of drowning person found after eight days in darvha of yavatmal