Amravati Crime : अमरावतीत बंद कारमध्ये आढळला मृतदेह, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण होईल स्पष्ट
Murder Investigation : काँग्रेसनगर मार्गावर एका बंद कारमध्ये ३० वर्षीय युवक अमित राजकुमार आठवले यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना उघडकीस आली.
अमरावती : शहरातील प्रतिष्ठित लोकवस्ती असलेल्या काँग्रेसनगर मार्गावर एका बंद कारमध्ये युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सोमवारी (ता. १०) रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अमित राजकुमार आठवले (वय ३०, रा. वडाळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.