
वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या चमूसह रत्नापूर बिटात आले. घटनास्थळाची पाहणी केली. मृत वाघ हा पाच ते सहा वर्षांचा आहे. दोन वाघांच्या झुंजीत त्या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर : सिंदेवाही वनपरिक्षेत्रात येणाऱ्या रत्नापूर बिटात शनिवारी (ता. १२) सकाळी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनविभागातील वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा - Powerat80 : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले साहेबांबद्दल...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रात नवरगाव क्षेत्रात येते. या क्षेत्रात रत्नापूर बिट येते. घनदाट जंगलात व्याप्त असलेल्या या वनपरिक्षेत्रात गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या वाढली आहे. शनिवारी सकाळी काही शेतमजूर शेतावर जात होते. तेव्हा त्यांना या परिसरात दुर्गंधी येऊ लागली होती. त्यामुळे ते त्या दिशेने गेले. तेव्हा एक वाघ मृतावस्थेत आढळून आला.
हेही वाचा - आयुष विरुद्ध आयएमए सामना, ओपीडी बंद ठेवत शस्त्रक्रिया करण्याच्या निर्णयाला विरोध
या घटनेची माहिती मजुरांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या चमूसह रत्नापूर बिटात आले. घटनास्थळाची पाहणी केली. मृत वाघ हा पाच ते सहा वर्षांचा आहे. दोन वाघांच्या झुंजीत त्या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.