आयुष विरुद्ध आयएमए सामना, ओपीडी बंद ठेवत शस्त्रक्रिया करण्याच्या निर्णयाला विरोध

ima doctors opposes to central government decision about ayush doctors
ima doctors opposes to central government decision about ayush doctors

अमरावती : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक चिकित्सकांना शस्त्रक्रियेची परवानगी देण्याच्या मुद्यावरून आता अ‌ॅलोपॅथी व आयुर्वेदिक चिकित्सक आमनेसामने आले आहेत. या निर्णयाविरोधात आयएमएच्या डॉक्‍टरांनी शुक्रवारी (ता.11) ओपीडी बंद ठेवून आपला रोष व्यक्त केला, तर आयुष डॉक्टरांनी गुलाबी फिती बांधून या निर्णयाचे स्वागत केले. ओपीडी बंद असल्या तरी इमर्जन्सी रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आली होती.  

केंद्र सरकारने एमएस केलेल्या आयुष डॉक्‍टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आयएमएचा या निर्णयास विरोध आहे. त्यामुळे हा संघर्ष उफाळून आला आहे. अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्यास आयुष डॉक्‍टरांना परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ असल्याचा आरोप आयएमएकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे आयुष डॉक्‍टरांनी गुलाबी पट्टी बांधून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आयएमएच्या वतीने शुक्रवारी ओपीडी बंद आंदोलन करण्यात आले. शहरातील जवळपास 225 दवाखाने, क्‍लिनिकमधील ओपीडी सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या, केवळ इमर्जन्सी रुग्णसेवा सुरू होती.  

आयएमएकडून संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. आचार्य सुश्रुत हे सर्वप्रथम आयुर्वेदीय शल्यचिकित्सक होते हे संपूर्ण जगाला माहिती आहे. लोकांच्या जिवाशी खेळ करण्यात येत असल्याचा अपप्रचार केला जात आहे. आयुष डॉक्‍टरांचा अभ्यासक्रमसुद्धा   एमबीबीएसच्या समकक्ष आहे. हा कोर्स केलेले डॉक्‍टर अशिक्षित कसे? या भ्रामक कल्पनांना आमचा विरोध आहे.
- डॉ. विपिन टोंगळे, सहसचिव 'नीमा' संघटना.

आपण ज्या शास्त्राचा अभ्यास केला आहे, त्याचा त्याने मान ठेवला पाहिजे. आपल्या स्वतःच्या पॅथी सोडून दुसऱ्याच्या पॅथीचा अवलंब कुणी केला तर ते समाजासाठी घातक ठरणार आहे. आमचे कुणाशी वैयक्तिक भांडण नाही. आपण जे ज्ञान घेतले ते त्याचा मान न ठेवता दुसऱ्याच्या पॅथीमध्ये हस्तक्षेप केला तर तो त्या पॅथीच्या डॉक्‍टरांवर अन्याय होईल. एखाद्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दुखापत झाली तर याची जबाबदारी प्रशासन घेणार का? हा आमचा प्रश्‍न आहे.
-डॉ. नीरज मुरके, कार्यकारिणी सदस्य, आयएमए.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com