esakal | कामानिमित्त शेतात गेला शेतकरी; नाल्याजवळ पोहोचताच दिसला वाघ, पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

dead tiger was found in Sonegaon Shivara of Yavatmal district

मंगळवारी आसन शिवारातील शेतकरी दिनेश लोहकरे हे शेतात जात असताना त्यांना नाल्यात वाघ दिसला. याबाबत त्यांनी ग्रामस्थांना सूचित केले. ग्रामस्थांनी खातरजमा केली असता वाघ मृत असल्याचे समजले.

कामानिमित्त शेतात गेला शेतकरी; नाल्याजवळ पोहोचताच दिसला वाघ, पुढे

sakal_logo
By
तुषार अताकरे-प्रवीण नैताम

घोन्सा-वणी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील घोन्सा-सोनेगाव लगत आसन शिवारातील नाल्यात वाघाचा मृतदेह मंगळवारी (ता. २३) दुपारी १.३० वाजता एका शेतकऱ्याला आढळला. वाघाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वनविभागाचे अधिकारी तपास करीत आहे. मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे व मुकूटबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. जी. वारे यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. पाच वर्षीय वाघीण असल्याचे समजले असून गळ्यावर आढळलेल्या जखमा नेमक्या कशाने झाल्या याबाबत वनविभाग तपास करीत आहे.

घोन्सा शिवारातील जंगलात वाघाचा मागील दीड वर्षापासून वावर होता. परंतु, पंधरा दिवसांपासून पशुधनावरील हल्ल्याचे प्रकार वाढले होते. चार ते पाच दिवसापूर्वी सिंधी वाढोना येथील शेतात काम करणाऱ्या तीन तरुणावर वाघाने झडप घातली होती. यात ते किरकोळ जखमी झाले होते. याबाबत वन विभागाकडे परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी सुद्धा केल्या होत्या.

जाणून घ्या - अख्खं गाव हळहळलं! पती-पत्नी पाठोपाठ मुलीचाही मृत्यू, एकाचवेळी निघाली तिघांची अंत्ययात्रा

मंगळवारी आसन शिवारातील शेतकरी दिनेश लोहकरे हे शेतात जात असताना त्यांना नाल्यात वाघ दिसला. याबाबत त्यांनी ग्रामस्थांना सूचित केले. ग्रामस्थांनी खातरजमा केली असता वाघ मृत असल्याचे समजले. याप्रकरणी तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले. मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे व मुकूटबनचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. जी. वारे यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. पाच वर्षीय वाघीण असल्याचे समजले असून गळ्यावर आढळलेल्या जखमा नेमक्या कशाने झाल्या याबाबत वनविभाग तपास करीत आहे.

loading image