esakal | गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविताना मूर्तिकाराचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविताना मूर्तिकाराचा मृत्यू

गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरविताना मूर्तिकाराचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील नामवंत मूर्तिकार स्नेहल बंडू वनकर यांचे शुक्रवारी (ता. १०) सकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवत असताना ही घटना घडली. मृत्यूसमयी ते ५० वर्षांचे होते.

केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर विदेशातही वनकर मूर्तीसाठी प्रसिद्ध होते. त्यांचे वडील बंडू वनकर, भाऊ सचिन हेदेखील प्रसिद्ध मूर्तिकार होते. गणेशचतुर्थी असल्याने शुक्रवारी सकाळपासूनच ते गणेश मूर्तीवर अखेरचा हात मारण्यात व्यस्त होते. गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यवतमाळ येथील मोक्षधामातील भगवान शिवाची मूर्ती त्यांनी तयार केली आहे.

हेही वाचा: गणपतीच्या नेवैद्यासाठी अशी बनवा मोदकाची उकड

याशिवाय नव्यानेच लोहारा चौकात नंदीची मोठी मूर्तीही त्यांनीच बनविली होती. शिवाय विदेशातही त्यांनी घडवलेल्या अनेक मूर्त्या गेलेल्या आहेत. त्यांच्या अकस्मात मृत्यूने यवतमाळवासींवर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुले असा आप्तपरिवार आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचे बंधू सचिन वनकर यांचा नवरात्रीदरम्यान मृत्यू झाला होता. यवतमाळचे वनकर कुटुंबीय मूर्तिकार म्हणून सर्वत्र परिचित आहे.

loading image
go to top