नगराध्यक्ष रवींद्र पवार यांचे देहावसान; पुणे येथील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

शरद केदार
Tuesday, 27 October 2020

पवार हे मागील सहा वर्षांपासून आजाराने ग्रस्त होते. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कावीळने अखेर त्यांचा घात केला. त्यांना पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पवार यांनी गजानन महाराजांच्या सामूहिक पारायनातून अध्यात्मिक क्षेत्रात तर समाजसेवेच्या माध्यमातून समाजसेवेत मानाचे स्थान प्राप्त केले होते.

चांदूरबाजार (जि. अमरावती) : स्थानिक नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष रवींद्र पवार यांचे दीर्घ आजाराने पुणे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. मागील एक महिन्यापासून ते आजारी होते. दहा दिवस अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर सोमवारी (ता. २७) रात्री ११.४० ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील जनमाणसात हळहळ व्यक्त केली गेली.

पवार हे मागील सहा वर्षांपासून आजाराने ग्रस्त होते. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कावीळने अखेर त्यांचा घात केला. त्यांना पत्नी, मुलगा व मुलगी आहे. पवार यांनी गजानन महाराजांच्या सामूहिक पारायनातून अध्यात्मिक क्षेत्रात तर समाजसेवेच्या माध्यमातून समाजसेवेत मानाचे स्थान प्राप्त केले होते. यातूनच ते नगराध्यक्षपदाच्या २०१६ थेट निवडणुकीतून विजयी झाले होते. मात्र, मृत्यूमुळे त्यांची करकीर्द एक वर्ष अपूर्ण राहिली. त्यांची राजकारणाची सुरुवात ही रक्तदान शिबिरापासून झाली होती.

अधिक वाचा - एकनाथरावांना सासुरवाडीतून कोण साथ देणार?

पवार यांच्या जाण्याने तालुक्यासह शहरातील राजकारण, भारतीय जनता पक्ष, समाजकारण, रक्तदान चळवळ यांची अपरमित हानी झाली आहे. समाजकार्यातील देव माणूस गेल्याने तालुक्यातील जनमानसामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पवार यांच्या मृत्यूची बातमी समजतात शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Ravindra Pawar at Pune