esakal | मेयोत मृत्यूचा टक्का वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

मेयोत मृत्यूचा टक्का वाढला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः गावखेड्यातील झोपडपट्ट्यांतील गरिबांच्या आरोग्याचा आधार इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आहे. दरवर्षी लाखो रुग्ण येथे भरती होतात. मात्र येथील व्यवस्थेचा बोजवारा वाजल्याने रुग्णांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. 2018 मध्ये दोन हजार दोनशे पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मेयोतील मृत्यूचा टक्का वाढला आहे.
सामान्य, गरिबांच्या आरोग्याचा आरोग्य हे सरकारी रुग्णालयावरच अवलंबून आहे. खासगी रुग्णालयातील उपचार गरिबांच्या आवाक्‍यात नाही. आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे. परंतु सरकारी रुग्णालयातून या मूलभूत अधिकारालाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र येथील सोयी सुविधांवरून दिसून येते. 24 तास डॉक्‍टर उपलब्ध असतात, असे सांगण्यात येते. परंतु आगीसारखी घटना पुढे आल्यानंतर येथे डॉक्‍टर नसल्याचे विदारक वास्तव पुढे येते. अशा गलथान कारभारामुळे मृत्युसंख्येत वाढ झाली आहे.
2016 मध्ये 2012 मृत्यू झाले होते. तर 2017 मध्ये 1983 मृत्यू झाले असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून मिळवली आले. याशिवाय जानेवारी ते ऑगस्ट 2019 या अवघ्या आठ महिन्यांत मेयो रुग्णालयात सर्पदंशाच्या 110 रुग्णांवर उपचार झाले आहेत. कुत्रा चावल्याचे तसेच स्वाइन फ्लूच्या एकाही रुग्णावर मेयोत उपचार झाले नसल्याचेही उघड झाले आहे. तर डेंगीच्या अवघ्या 6 रुग्णांना येथे उपचार मिळाले.

मेयोतील यंत्र बंद
- दोन्ही एबीजी यंत्र बंद
- एक व्हेंटिलेटर बंद
- 2 डी कलर डॉप्लर बंद
- सर्व सिरिंज इन्फ्युजन पंप बंद

loading image
go to top