पंधरा दिवसांपासून तिची प्रकृती होती खराब, प्रशासनाने सुटीच्या अर्जाकडे केले दुर्लक्ष अन्...

मुनेश्वर कुकडे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत जीएनएम हे नर्सेस प्रशिक्षण सुरू आहे. जीएनएमचे प्रशिक्षण व याच काळात रुग्णालयात सेवा देण्याचे काम शुभांगी बांगरे करीत होती. तिची प्रकृती १५ दिवसांपासून बिघडली होती. तिने सुटी मिळावी म्हणून रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती. सुटीचा अर्जदेखील केला होता. परंतु, तिचे कोणीही ऐकले नाही.

गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात शासकीय नर्सिंग कॉलेजअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तेढवा येथील शुभांगी गजानन बांगरे (वय २२) हिचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेनंतर नर्सिंगच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संताप व्यक्त करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी तीननंतर आंदोलन केले. प्रकृती खराब असताना रुग्णालय प्रशासनाने सुटी मागूनही शुभांगीला सुटी दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत जीएनएम हे नर्सेस प्रशिक्षण सुरू आहे. जीएनएमचे प्रशिक्षण व याच काळात रुग्णालयात सेवा देण्याचे काम शुभांगी बांगरे करीत होती. तिची प्रकृती १५ दिवसांपासून बिघडली होती. तिने सुटी मिळावी म्हणून रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती. सुटीचा अर्जदेखील केला होता. परंतु, तिचे कोणीही ऐकले नाही. त्यामुळे ती प्रकृती बरी नसूनदेखील रुग्णालयात रुग्णसेवा करीत होती.

जाणून घ्या - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

दरम्यान, शुभांगीची प्रकृती अजून खालावल्याने तिचा शनिवारी केटीएस रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केले. प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रेटून धरली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

चौकशीसाठी समिती तयार 
या घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 
- डॉ. विनायक रुखमोडे, 
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया

 संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a trainee student of Gondia Nursing