मंडप डेकोरेशनच्या दुकानाला आग, २० लाखांचे नुकसान

रामदास पदमावर
Sunday, 15 November 2020

दिग्रस-पूसद बायपास रोडवर इरफान खान यांचे मंडप डेकोरेशनचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाला आग लागली. परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.

दिग्रस (जि. यवतमाळ):  दिग्रस-पूसद बायपास वरील मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये डेकोरेशन साहित्याची राख झाली असून आगीचे कारण अस्पष्ट आहे. यामध्ये जवळपास २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - 'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

दिग्रस-पूसद बायपास रोडवर इरफान खान यांचे मंडप डेकोरेशनचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाला आग लागली. परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर तब्बल तीन ते चार तासानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील मंडप डेकोरेशनसाठी लागणारे कापड, रेलींग, फायबरचे डिझाईन, महाराजा चेअर, डिजेचे साहित्य, लाकडे, बासे असे इतर साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण अस्पष्ट आहे. त्यामुळे मंडप डेकोरेशनचे संचालक इरफान खान यांनी अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास दिग्रस पोलिस करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decoration shop caught fire in digras of yavatmal