'चीज'वरही मिळतेय कर्ज, पण ही बँक नेमकी आहे कुठे?

भाग्यश्री राऊत
Sunday, 15 November 2020

हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल किंवा काय हे विचित्र सांगतात, असेही अनेकांच्या मनात आले असेल. पण, थांबा. काहीही विचार करण्याच्या आधी हे कर्ज कोणत्या बँकेतून घेऊ शकतो, हे वाचा.

नागपूर : आपण सोशल मीडिया स्क्रोल करताना अचानक चीज असलेले पदार्थ आपल्यासमोर येतात. त्यामुळे काहींच्या तोंडाला लगेच पाणीही सुटते. पण, काहींना चीज आवडत देखील नाही. पण, चीज आवडणाऱ्या व्यक्तींना देखील चीजमुळे कर्ज मिळू शकते, हे माहिती नसेल. कदाचित यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. पण, हे खरे आहे.

हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल किंवा काय हे विचित्र सांगतात, असेही अनेकांच्या मनात आले असेल. पण, थांबा. काहीही विचार करण्याच्या आधी हे कर्ज कोणत्या बँकेतून घेऊ शकतो, हे वाचा. चीजचा किंग असणाऱ्या विशिष्ट बँकेमध्येच ही सेवा उपलब्ध आहे. ही कहाणी आहे, 'क्रेडीटो इमिलिअ‌ॅनो' या बँकेची. ते 'परमिजीअ‌ॅनो-रेग्गीअ‌ॅनो' या चीजचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देतात. हे चीज तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देतात. चीजसाठी कर्ज देणारी ही एकमेव बँक आहे. या बँकेत जाताच तुम्हाला सोने दिसण्यापूर्वी आंबट दुधाचा तीव्र गंध येईल. साठवलेले सोने पाहताक्षणी आपण स्वप्न पाहतो, की काय असेच वाटेल.  

हेही वाचा - Diwali Festival 2020 : लक्ष्मी मातेचे पहिले चित्र काढणारा चित्रकार आहे तरी कोण?

'क्रेडीटो इमिलिअ‌ॅनो' ही इटली येथील इमिलिअ‌ॅ प्रांतातील पारंपरीक बँक आहे. अनेक बँका कर्ज देण्यासाठी सोने, घर, जमिन आपल्याकडे गहाण ठेवून संबंधित प्रॉपर्टीच्या मालकाला कर्ज देतात. मात्र, इटलीतील ही बँक शेतकऱ्यांकडून चीज घेऊन त्यांना कर्ज देते. तुम्ही विचारही नाही करू शकणार इतके चीज या बँकेने साठवले आहे. मात्र, कुठल्याही चीजवर ही बँक कर्ज देत नाही. फक्त 'परमिजिअ‌ॅनो रेग्गीअ‌ॅनो' या चीजवरच कर्ज मंजूर होते. कारण या चीजला डेअरी किंग्डममध्ये चांगली मागणी असते. 

हेही वाचा - मुलांसाठी दिवाळीची खरेदी केली अन् घरी निघाला, पण रस्त्यातच काळाने केला घात

फ्रान्समधील स्थानिक ब्रँड म्हणून ज्याप्रमाणे शँम्पेन वाईन ओळखली जाते, तसेच इटलीमधील हे चीज देखील ओळखले जाते. या चीजला पूर्णपणे तयार होण्यासाठी १८ ते ३६ दिवस लागतात. बँक हे चीज त्यांच्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवते. यामध्ये जवळपास ४४ कोटी ८० हजार पाऊंड चीज साठविण्याची क्षमता असते. साठवलेल्या चीजची चव आणि दर्जा राखण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. या कर्ज देण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकरी सावकारी पाशाला बळी पडत नाहीत. 

हेही वाचा - "साहेब, सगळे दिवाळी साजरी करताहेत, आमचं काय?" फुलांचा योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा...

तुम्हाला चीज पास्ता आवडत असेल आणि परमिजिअ‌ॅनो रेग्गीअ‌ॅनोच्या गोडाऊनला भेट देण्याचा विचार असेल, तर त्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण, चीजचे हे गोडाऊन पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bank which accept only cheese as collateral