esakal | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चौकशी समितीचा अहवाल लांबणीवर; सोमवारी समिती सदस्यांची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

deepali chauhan suicide

चौकशी समितीचा अहवाल लांबणीवर; सोमवारी समिती सदस्यांची बैठक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठित आयएफएस अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीचा अहवाल लांबणीवर पडला आहे. दीपाली चव्हाण हिने २६ मार्च २०२१ रोजी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी रिव्हॉल्हरने गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

समितीचे अध्यक्ष असलेले प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. के. राव हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी निवृत्तीपूर्वी समितीच्या सर्वच सदस्यांना आतापर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल अवलोकनार्थ सादर केला. अहवालाच्या प्रारूपाला अंतिम मान्यता अद्याप मिळालेली नाही. जो अहवाल समिती सदस्यांच्या अवलोकनार्थ पाठविला गेला त्यावर सदस्यांना त्यांचे मत सादर करण्यासाठी काही वेळ हवा होता. त्यामुळे समितीची पुढील बैठक सोमवारी (ता. ६) होईल. त्यावर सर्वच सदस्यांसह इतर पदाधिकाऱ्यांचे मत ग्राह्य धरले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: पुण्यातील युवकाने केला नागपुरातील युवतीवर बलात्कार

समितीचे अध्यक्ष असलेले एम. के. राव हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे समितीमधील त्यांची जागा वरिष्ठ स्तरावरून कोण अधिकारी घेईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर तो प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर यांना सादर केला जाईल. अद्याप चौकशीचा अहवालच तयार झाला नाही, असे मत मावळते एम. के. राव यांनी व्यक्त केले.

loading image
go to top