Video : पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाने आणले चक्क हरणाचं मटण, मग...

Deer hunting in Ner taluka of Yavatmal district
Deer hunting in Ner taluka of Yavatmal district

नेर (जि. यवतमाळ) : नेर वनविभागाअंतर्गत उत्तरवाढोना येथे बिबट्याचे शिकार प्रकरण ताज असता शुक्रवारी तालुक्‍यातील रेनुकापूर शेत शिवारात हरणाची शिकार झाल्याची घटना घडली आहे. वनविभागाने सापळा रचून हरणाच्या मटणासह संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

काही दिवसांपूर्वीच तालुक्‍यातील उत्तरवाढोना येथे बिबट्याची शिकार झाली होती. यामध्ये वनविभागाच्या सामूहिक पथकाने घातलेल्या धाडीत बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली होती. यानंतर नेर वनविभागाने तालुक्‍यातील वन्यजिवाची शिकार करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली. शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील रेनुकापूर परिसरात हरणाचे मटण विकण्यात येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली.

यावरून नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांच्यासह वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले. वनविभागाने बनावट ग्राहक पाठवून हरणाची मटण विक्री होत असल्याची खात्री करताच संशयित महिला नमुना मिक्‍सिंग पवार (वय 60, रा. रत्नापूर, बेडा) हिला ताब्यात घेतले. हरीण मादी असून, मुंडके, मास, मटण विक्री करणारे तराजू यासह एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. 

आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांच्या मार्गदर्शनात, उपविभागीय वन अधिकारी मकरंद गुजर यांच्या सूचनेवरून नेर वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे, क्षेत्र सहायक आर. डी. जाधव, वनरक्षक पी. बी. खत्री, वनरक्षक सृष्टी लक्षण राठोड, वाहनचालक अशोक कदम, सचिन देशमुख, किशोर झाडे, शुभम मेश्राम, शंकर इंगोले यांनी केली आहे.

मटण घेणाऱ्यांचाही शोध

हरणाच्या शिकार प्रकरणात अन्य कोणत्या आरोपींचा समावेश आहे? याआधी अन्य किती वन्यप्राण्यांची शिकार त्यांच्याकडून करण्यात आली का? हरणाचे मटण घेणाऱ्या ग्रहकांचा ही शोध घेतला जाणार असल्याचे "सकाळ'शी बोलताना तपास अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास नेर वनविभागाकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com