विवाहित महिलेला दाखवले चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष अन्‌ केले असे कृत्य... 

Defamation of a woman by viraling photos and videos on social media
Defamation of a woman by viraling photos and videos on social media

अमरावती : एका युवकाची दोन वर्षांपूर्वी शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. महिला दिसायला सुंदर असल्याने युवकाने चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवले. त्याच्या आमिषाला महिला बळी पडली. चित्रपटात काम मिळणार असल्याने तिने युवकासोबत काही फोटो आणि व्हिडिओ काढले. चित्रपटात काम मिळवून न देता फोटो आणि व्हिडिओ व्हायर केले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पराग टेंभुर्णे असे आरोपी युवकाचे नाव आहे. तो साकोली येथील रहिवासी आहे. पराग आणि विवाहिता महिलेची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत परागने दिसायला सुंदर असलेल्या महिलेला चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. चित्रपटात काम मिळणार असल्याने महिला पार खूश झाली. 

डायरेक्‍टरला दाखवण्यासाठी काही फोटोंची आवश्‍यकता असल्याचे सांगून परागने महिलेसोबत फोटो आणि व्हिडिओ काढला. बरेच दिवस उलटूनही काम मिळत नसल्याने ती निराश झाली. यानंतर तिने परागला कामाबाबत विचारणा सुरू केली. मात्र, तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. परागची कोणाशी ओळखी नसून तो आपल्याला काम मिळवून देणार नाही, असे समजताच तिने फोटो आणि व्हिडिओ परत मागितले. परंतु, परागने ते परत न करता सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

भांडणाचा घेतला फायदा

फसवणूक झालेली महिला विवाहित असल्याने परागने संसारात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली होती. यामुळे महिला व पतीत खटके उडायला सुरुवात झाली. त्याचे नेहमी भांडणही होत होते. नेमक्‍या या भांडणाचा फायदा घेत परागने स्वतः महिलेसोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल करीत बदनामी केली. 

विनयभंग केल्याची तक्रार

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पराग तिला व कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची धमकी देत होता. सतत मोबाईलवर संपर्क साधून त्रास देत होता. पाठलाग करून विनयभंग केल्याची तक्रार महिलेने दिली. तिच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी युवकाविरुद्धगुन्हा दाखल केला आहे. पराग सध्या फरार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com