esakal | कोरोना थांबविण्यासाठी भिलवाडा पॅटर्न या जिल्ह्यात लागू करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

ravikant tupkar.jpg

जर जिवनावश्यक वस्तू नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविल्या गेल्या तर रस्तावर गर्दी होण्याचे काम नाही. राजस्थान मधील भिलवाडा या रेड झोन मधील कोरोना ग्रस्त जिल्ह्यात अशीच पद्धत अवलंब केल्यामुळे कोरोना संपुष्टात येणे सुरू झाले आहे.

कोरोना थांबविण्यासाठी भिलवाडा पॅटर्न या जिल्ह्यात लागू करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : कोरोनवर कोठलेही औषध नाही म्हणून देशात लॉक डाउनचा पर्याय लागू झाला आहे. घरी थांबून कोरोनाच्या संपर्कात न येणे हाच पर्याय सध्या प्रशासनाने अंमलात आणला आहे. परंतु जिल्ह्यात नागरिकांकडून ठिक-ठिकाणी लॉकडाऊनचा फज्या उडविला जात आहे. अर्थात जिवनावश्यक वस्तू घेण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडावे लागत आहे. 

याअनुषंगाने जर जिवनावश्यक वस्तू नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविल्या गेल्या तर रस्तावर गर्दी होण्याचे काम नाही. राजस्थान मधील भिलवाडा या रेड झोन मधील कोरोना ग्रस्त जिल्ह्यात अशीच पद्धत अवलंब केल्यामुळे कोरोना संपुष्टात येणे सुरू झाले आहे. म्हणून बुलडाणा जिल्ह्यात ही भिलवाडा पॅटर्न राबविला गेला तर निश्‍चितच जिल्हा कोरोना मुक्त होण्यास मदत होईल अशी महत्वपूर्ण मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या निवेदनामार्फत केली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो सावधान, वादळी पाऊस येतोय!

बुलडाणा जिल्ह्यात दिवसागणित कोरोना संसर्गगीतांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनची मर्यादा 14 एप्रिल असली तरी ती ती मुदत वाढू शकते अश्या वेळी जिल्हा प्रशासनाने जर आतापासून प्रभागनिहाय टीम करून नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या माध्यमातून  जिवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. जे कर्मचारी कोरोनाच्या लढाईत सहभागी नाही ते कर्मचारी तसेच समाजसेवी संस्था स्वयंसेवक यांना विशेष प्रशिक्षण देवून त्यांच्या उपयोग घरपोच वस्तू पुरविण्यासाठी होईल. जेणेकरून कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे तुपकरांनी यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. राजस्थान येथील भिलवाडा जिल्ह्यात राबविली आहे त्याच धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यात ही योजना राबवून कोरोनाला आळा घालण्याचे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.