छत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

आज विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या उंचीचा विषय चांगलाच गाजला. यावेळी चर्चा सुरु असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे बोलल्यानंतर सभागृहामध्ये गदारोळ झाला.

नागपूर : मनुवादी भातखळकरचा निषेध असो, भातखळकरांचे निलंबन करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा, भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार विजय भाबळे, आमदार प्रदीप नाईक, आमदार संजय कदम आदींसह सर्वच आमदार सहभागी झाले होते.

आज विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या उंचीचा विषय चांगलाच गाजला. यावेळी चर्चा सुरु असतानाच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधक ‘भलत्याच’ गोष्टींवर चर्चा करतात असे बोलल्यानंतर सभागृहामध्ये गदारोळ झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो...जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भातखळकरांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. त्यामुळे सुरुवातीला 10 मिनिटासाठी आणि नंतर पुन्हा 15 मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.

याचवेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अतुल भातखळकरांचे निलंबन केल्याशिवाय आम्ही सभागृह चालू देणार नाही असा इशारा सभागृहात दिला. ही मनुवादी प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात राहता आणि छत्रपतींचा अपमान करता याचा निषेधही विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.

Web Title: demand to arrest atul bhatkhalkar for insulting shivaji maharaj