सरकारने दिला शेतकऱ्यांच्या हाती भोपळा, वाचा काय सांगतात आमदार अडसड

शेतकरी
शेतकरी

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : गत राज्य सरकारने सोळा वर्षातील शेतकऱ्यांची यादी तयार करून लाभ दिला. मात्र, या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील चार वर्षांच्या थकीत शेतकऱ्यांच्या हातात केवळ 42 लाख 88 हजार रुपयांचा भोपळा दिला असून, खरीप हंगाम सुरू झाल्याने त्वरित सरकारने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी आमदार प्रताप अडसड यांनी केली.

मागील देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये सुरू केली. या यादीत सन 2001 पासून शेतकऱ्यांची लाभार्थी यादी ठरवली होती. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 79 हजार 453 शेतकऱ्यांच्या खात्यात 844.38 कोटी रुपये जमा झालेले होते. म्हणजेच त्यांना एवढ्या रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. त्यापैकी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 97 हजार 338 शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्‍कम जमा झाली. तसेच तत्कालीन शासनाने संबंधित बॅंकेकडे ही रक्कम जमा केले होती. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन 2019 मध्ये सुरू केली. यात 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत या कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या कालावधी आहे. म्हणजे फक्त चार वर्ष दोन लाखापर्यंत कर्जमाफीच्या मर्यादा आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील केवळ तिवसा तालुक्‍यातील वर्हा व धारणी तालुक्‍यातील बिजुवाडी या दोन गावाच्या याद्या प्राप्त झाल्या होत्या सदर गावांमधील असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक बॅंकेचे संबंधित 69 खातेदार शेतकरी यांच्या खात्यात 42.88 लाख इतकी रुपये आतापर्यंत फक्त जमा झाले आहे. त्यामुळे या सरकारची कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी भोपळा ठरली असल्याचे मत आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.

कधी मिळणार शेतकऱ्यांना लाभ
गत सरकारने 2001पासून ते 2016 पर्यंतच्या शेतकऱ्यांचे नाव पात्र यादी घेतले होते. या सरकारने केवळ चार वर्षाच्या शेतकऱ्यांना लाभ देण्याची कर्जमुक्ती योजना आणली. विशेष म्हणजे मागील कर्जमाफी योजनेतील काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जोपर्यंत 2001 ते 2916 पर्यंतच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही असे जाहीर केले होते. दुर्दैवाने मित्र पक्षाने केलेल्या विश्वासघातामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाही व या राहिलेल्या शेतकऱ्यांवर नवीन आलेल्या सरकारने अन्याय केल्याचे अडसड म्हणाले.

खरीप हंगाम गेल्यावर देणार का मदत
मागील एक वर्षात गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या हातात पेरणीसाठी रक्कम नाही. खरीप हंगाम सुरू झाला असताना शेतकऱ्यांना त्वरित मदत देणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थी यादीला मंजुरात देणे गरजेचे आहे. हा हंगाम गेल्यावर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार का ? असा सवाल प्रतापदादा अडसड यांनी राज्य सरकारला विचारला आहे. शेतकऱ्याचा अधिक अंत या सरकारने पाहू नये असेही आमदार अडसड म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com