esakal | कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना दातांची समस्या; दंतरोग तज्ज्ञांचं मत

बोलून बातमी शोधा

dental problems
कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना दातांची समस्या; दंतरोग तज्ज्ञांचं मत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : "कोविड-19'ने जगाला हादरा दिला आहे. दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांमध्ये दातांची समस्या निर्माण होत आहे. त्याला म्युकॉरमायकोसिस म्हणून संबोधले जाते. मात्र, हा आजार संसर्गजन्य नाही. वेळीच उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते, अशी माहिती दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत तामगाडगे यांनी दिली.

हेही वाचा: विवाह समारंभांमध्ये कोरोनाची पंगत! सुपरस्प्रेडर वाटतात कोरोनाचा प्रसाद; नियमांची पायमल्ली

पोस्ट कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या आजार व काळजी या संदर्भात डॉ. तामगाडगे यांनी दैनिक"सकाळ'शी संवाद साधला. म्युकॉरमायकोसिस दूर्मिळ असला तरी नवा नाही. रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांत ब्लॅक फंगस म्हणजे म्युकॉरमायकोसिस होणे, मृत्यू होणे अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. मात्र, कोविड काळात त्याची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ही समस्या दिसत आहे.

या विकाराला झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखले जाते. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (सीडीसी) प्रिव्हेंशन म्हणण्यानुसार हा बुरशीजन्य संसर्ग दूर्मिळ आहे. गेल्या 20-25 दिवसांत दंतचिकित्सकांकडे म्युकॉरमायकोसिसच्या केसेस आढळल्या आहेत. मानव शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनस यांच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो.

खुल्या जखमामधूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करू शकते. म्युकॉरमायकोसिस लागण संसर्गजन्य नाही. म्हणजे एकापासून दुसऱ्याला, प्राण्यांपासून माणसाला त्याची लागण होत नाही, असेही सीडीसीने स्पष्ट केले आहे. योग्य निदान आणि उपचाराने रुग्ण लवकर बरे होतात, ही जमेची बाजू आहे. मधूमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे एकंदरीत ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांना म्युकॉरमायकोसिसचा जास्त धोका आहे.

हेही वाचा: ‘गेम’ होण्याच्या भीतीपोटी त्यानं केला पिंकीचा खून; हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक

लक्षणे ओळखा

तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, सायनस रक्तसंचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्याच्यावर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे.

संपादन - अथर्व महांकाळ