esakal | ‘गेम’ होण्याच्या भीतीपोटी त्यानं केला पिंकीचा खून; हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक

बोलून बातमी शोधा

crime

‘गेम’ होण्याच्या भीतीपोटी त्यानं केला पिंकीचा खून; हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : काही मुलांना हाताशी धरून वस्तीत दादागिरी करणाऱ्या पिंकी वर्माने चार दिवसांपूर्वीच आरोपीला ‘गेम’करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे धास्तीत जगत असलेल्या आरोपीने पिंकीचाच काटा काढला. या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. सागर उईके (तांडापेठ) आणि अमन मसराम (रामबाग) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा: रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार; क्वॉरंटाइन कोचेसच्या वापरासंदर्भातही चर्चा सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी वर्मा हिची वस्तीत दहशत होती. वस्तीतील दुकानदार, व्यापारी, अवैध धंदे करणारे, वाहतूकदार आणि नागरिकांना त्रस्त करीत होती. अनाथ असलेल्या सागर उईके याला घरदार नसल्यामुळे तो तांडापेठ चौकात असलेल्या ओट्‍यावर झोपत होता. रात्रीच्या सुमारास पिंकीची काही युवकांसोबत चौकात बैठक होती.

ती रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत मौजमजा करीत त्या ओट्‍याजवळ उभी राहत होती. तेथे सागर उईके झोपत असल्यामुळे पिंकी आणि तिच्या मित्रांनी खटकत होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपूर्वी तिने सागरला ओट्‍यावर न झोपण्याची तंबी दिली होती. पुन्हा झोपलेला दिसल्यास झोपेतच खल्लास करेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे सागर घाबरला होता. कोणत्याही क्षणी ती आपला गेम करेल, अशी भीती होती. त्यामुळे त्याने मित्र अमन मसराम याला मदत मागितली.

हेही वाचा: गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

पिंकीने आपला गेम करण्यापूर्वी तिचाच गेम करू, अशी योजना आखली. मंगळवारी दुपारी पिंकी तांडापेठ चौकात उभी असतानाच अमन आणि सागरने तिला गाठले. तिला काही कळण्यापूर्वीच तिच्यावर चाकूने वार करीत खून केला. पाचपावली पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ