पेट्रोल-डिझेलचे दर दोनशे रुपये लिटर करा, कोणी केली ही मागणी...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

कोविड-19 साथीच्या निमित्ताने अनेक मध्यमवर्गीय नोकऱ्या सोडून ऐतखाऊ झालेले असल्याचे सरकारचे अवलोकन अगदी योग्य असल्याने सरकार दररोज पेट्रोल-डिझेल वाढवत आहेत, असे सांगत मृतप्राय समाजात मरण शांतता निर्माण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा दर दोनशे रुपये प्रती लिटर करा, अशी उपरोधिक विनंती वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीने करण्यात आली. 

अमरावती :  पेट्रोल-डिझेलवर महागाई अवलंबून असते असं म्हणतात. हे खरंही आहे. कारण, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास सर्वकाही महाग होऊन जाते. यामुळे गृहिणींचे बजट कोलमळते. तसेच नागरिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. मागील 22-23 दिवसांपासून दर दिवसागणिक वाढतच आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच असंताष भडकला आहे. याच असंतोषातून पेट्रोल-डिझेलचे दर दोनशे रुपये लिटर करण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

इंधन दरवाढीचा सर्वात जास्त प्रभाव मध्यमवर्गीयांवर होत असला तरी मध्यमवर्गीय वैयक्तिक जीवनात रममान व सामाजिक-राजकीय पातळीवर संवेदनाहीन किंबहुना मृतप्राय आहे. दुसरीकडे गरीब जनता कुटुंबाला जगविण्याच्या संघर्षात आहे. या सर्व गोष्टीचा पारंपरिक शोषक म्हणून फायदा घेण्याची संधी केंद्र सरकारकडे आहे. 

सविस्तर वाचा - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

कोविड-19 या साथीच्या गेल्या तीन महिन्यांच्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 हजार कोटींच्या आर्थिक मदतीची रक्कम जनतेच्या बॅंक खात्यात जमा होत आहे. सरकारने निवडणुकीत जाहीर केलेले 15 लाख रुपये जनतेच्या खात्यात जमा होत आहेत. सामान्य जनतेला ते कुठे खर्च करायचे हा प्रश्‍न पडला आहे. गेल्या तीन महिन्यांत केंद्र सरकारने दिलेला तीन किलो तांदूळ व पाच किलो गहू संपता संपत नाही. परिणामी जनतेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. 

कोविड-19 साथीच्या निमित्ताने अनेक मध्यमवर्गीय नोकऱ्या सोडून ऐतखाऊ झालेले असल्याचे सरकारचे अवलोकन अगदी योग्य असल्याने सरकार दररोज पेट्रोल-डिझेल वाढवत आहेत, असे सांगत मृतप्राय समाजात मरण शांतता निर्माण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचा दर दोनशे रुपये प्रती लिटर करा, अशी उपरोधिक विनंती वंचित बहुजन आघाडी अमरावतीच्या वतीने करण्यात आली.

जाणून घ्या - प्रेयसीच्या घरातच प्रियकर होता महिनाभर लपून, काय असावे कारण?

निवेदन देतेवेळी ऍड. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. अलीम पटेल, दिलीप वासनिक, अविनाश गोंडाणे, ऍड. भरत खडसे, फुजेल सय्यद, सिद्धार्थ दामोधरे, मिलिंद दामोधरे, अनिल फुलझेले, पंकज वानखडे, श्रीकृष्ण तातड, सय्यद एजाज, सिद्धार्थ दांडगे, रमेश वानखडे, ऍड. रमेश तंतरपाळे, विजय डोंगरे, डॉ. समीर खान, साहेबराव नाईक, अंसार बेग आदी उपस्थित होते. 

उपरोधिक मागणी

पेट्रोल-डिझेलचे दररोज वाढ असल्याने नागरिकांमध्ये असंतोष भडकला आहे. कोरोनामुळे अगोदरच नोकरी गेली. हाताला काम नाही. जवळचे पैसेही खर्च झाले आहेत. नागरिकांना मदतीची गरज असताना सरकार दरवाढ करीत आहे. अगोदरच नुकसानीत असलेल्या नागरिकांशी सरकार खेळत आहे. यामुळे नागरिकांमधील रोष अधिकच वाढला आहे. अशातून अशी उपरोधिक मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deprived Bahujan Alliance's statement to the Finance Minister