"शेतकरी सन्मान'पासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

जलालखेडा : लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या बजेटमध्ये केंद्र शासनाने पाच एकरांच्या आत शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी दरवर्षी तीन हप्त्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये हप्ता असे वर्षाला सहा हजार देण्याची योजना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती व निवडणुकीच्या दरम्यान यात सुधारणा करून पाच एकरांवरील शेतकऱ्यांनादेखील या योजनेचा लाभ देण्याची घोषणा झाली होती. तरी पण नरखेड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज देऊन त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही व ते या योजनेपासून वंचित आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व कॉंग्रेसने दिलेली घोषणापत्रातील 72 हजार रुपयांची योजना यात भरपूर रंगत पाहायला मिळाली होती. जनतेनेही भाजपच्या योजनेला भरघोस मतांनी कौल देत भाजपला सत्तेवर विराजमान केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची योजना आहे. या अंतर्गत आधी पाच एकरांखाली शेतकऱ्यांना तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण यानंतर यात सुधारणा करून पाच एकरावरील शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्याचे जाहीर केले. नरखेड तालुक्‍यात महसूल विभागामार्फत प्रत्येक शेतकऱ्यांकडून अर्जासोबत आधारकार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्‍स गोळा करण्यात आले. अर्ज सदर केलेले शेतकरी आता मात्र बॅंकेत त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले का याच्या चौकशीसाठी गेले असता त्यांच्या खात्यात अनुदान आज पावेतो जमा झालेले नाही. हे शेतकऱ्यांना कळत असल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. जामगाव (बु.) येथील आदिवासी शेतकरी सुरेभान सीताराम कोडापे यांनी देखील त्यांच्या बॅंकेत चौकशी केली तर त्यांना बॅंकेतून रिकाम्या हाताने परत यावे लागले. तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे.

नरखेड तालुक्‍यातील 18 हजार285 शेतकऱ्यांची माहिती पाठविली आहे. यापैकी 13 हजार 699 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे ही अनुदान टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होईल.
-हरिश्‍चंद्र गाडे, तहसीलदार, नरखेड
.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deprived of "peasant honors"