पगार काटोलसाठी; कार्यरत दुसरीकडे; काटोल उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर; ट्रॉमा केअर सेंटर पांढरा हत्ती 

सुधीर बुटे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

रुग्णालयात चार निवासी डॉक्‍टर, सात परिचारिका, चार कक्षसेवक आदींना मंजुरी दिली. परंतु, प्रत्यक्षात चारपैकी तीन डॉक्‍टर कार्यरत आहेत. तर एक नागपूर डागा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांचे वेतन काटोल येथून निघत आहे.

काटोल, (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले तालुक्‍याच्या ठिकाणचे सर्वांत काटोल ग्रामीण रुग्णालयात वर्षाला 50 हजारांहून अधिक रुग्णांना सेवा देते. अर्थातच येथे कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, हजेरी पटावर हे कर्मचारी असले, तरी ते प्रतिनियुक्तीवर इतरत्र सेवा देत असल्याचे समोर आले आहे. यामुळे काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण आरोग्यसेवांपासून रुग्णांना वंचित राहत आहेत. 

काटोल नगर परिषदेच्या जनगणनेनुसार 43 हजार 426 लोकसंख्या तसेच तालुक्‍यातील 83 ग्रामपंचायत तालुक्‍यालगतचे नरखेड व कारंजा तालुक्‍यातील रुग्ण गरजेनुसार सेवा घेत आहे. दररोज 150 ते 200 पर्यंत रुग्णसेवा दिली जाते. या रुग्णालयात चार निवासी डॉक्‍टर, सात परिचारिका, चार कक्षसेवक आदींना मंजुरी दिली. परंतु, प्रत्यक्षात चारपैकी तीन डॉक्‍टर कार्यरत आहेत. तर एक नागपूर डागा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांचे वेतन काटोल येथून निघत आहे. याशिवाय सातपैकी दोन नर्स प्रतिनियुक्तीवर व एक जागा रिक्त आहे. कक्षसेवकसुद्धा प्रतिनियुक्तीवर आहेत. या सर्वांचे वेतन काटोल ग्रामीण रुग्णालयातून निघत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. 

कर्मचारीअभावी सेवा कधी प्रभावित

येथे सध्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी नरेंद्र डोमके शिवाय डॉ. शकील, डॉ स्नेहा चव्हाण कार्यरत आहे. सात दिवस चोवीस तास सेवा असणारे रुग्णालयात कर्मचारीअभावी सेवा कधी प्रभावित होत आहे. सर्व बाबीचा आढावा घेता मंजूर डॉक्‍टर व कर्मचारी गरजेचे असून केवळ ऑन पेपर दाखविले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेतन काटोल रुग्णालयाचे नावे व काम अन्य रुग्णालयात असे असेल, तर स्टाफ मंजुरीचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 

ट्रॉमा सेंटर सुरू झालेच नाही 

काटोल-नरखेड व परिसर बघता होणारे अपघात यामुळे ट्रॉमा केअर सेंटर इमारत पांढरा हत्ती म्हणून उभा आहे. येथे शस्त्रक्रिया संयंत्र, अर्थोसर्जन येत नसल्याने 6 ते 7 वर्षांपासून तयार असलेले ट्रॉमा केअर सेंटरची इमारत भंगार होत आहे. आरोग्यसेवा अधिक सक्षम झाल्यास परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधीनी लक्ष घालणे आवश्‍यक आहे. 

शवचिकित्सा व उपचार 

काटोल ग्रामीण रुग्णालयात दोन शवचिकित्सा केंद्र आहे. कोल्ड स्टोरेज आदी व्यवस्था आहे. नूतनीकरणाचे काम काही थांबले आहे. येथील कार्यरत डॉक्‍टर शवचिकित्सा करतात. त्यानुसार शाशनाने गृहीत स्टॉप अप्रोल केला आहे. काटोल ग्रामीण रुग्णालयात उपचार यंत्रणा तत्पर आहे. रुग्णाशिवाय परिसरात सर्वांत मोठे शासकीय रुग्णालय आहे. येथून अपघातात अतिगंभीर रुग्णच नागपूरला हलविले जातात.
 

वर्षांत सुमारे 50 हजार रुग्णांची तपासणी 

रुग्णसंख्या नोंदणीचे आकडेवारीनुसार 2018-19 मध्ये 49 हजार 256 तर 2019-20 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 39 हजार 963 रुग्णांनी उपचार घेतले आहे. मार्च 20 पर्यत सरासरी रुग्ण 50 हजारांचा आकडा गाठेल, असा कयास वाटतो. 

कर्मचारी तात्पुरते डेपोटेशनवर
काटोल ग्रामीण रुग्णालयात समाधानकारक तत्पर सेवा असल्याने रुग्णाची संख्या आहे. येथील काहीच कर्मचारी अल्पावधीकरिता तात्पुरते डेपोटेशनवर आहे. कायम नसल्यामुळे गरजेनुसार त्यांची सेवा लाभते. कुठलेच काम प्रभावित होत नाही. 
- डॉ. नरेंद्र डोमके,
वैद्यकीय अधिकारी, काटोल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On deputation of staff at Katol Hospital