
हिंगणघाट, (जि. वर्धा) : येथील तहसीलदार कार्यालयात बुधवारी (ता. चार) रोजी दुपारी एका बेरोजगार तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाला आणि आर्थिक अडचणींना कंटाळून हे पाऊल उचलल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. तहसीलदार योगेश शिंदे यांच्या दालनातच हा प्रकार घडला आहे.